Goa Football: द्राझिच २०२३-२४ मोसमात सायप्रसमधील एथनिकोस अचना एफसीतर्फे खेळला होता
FC Goa Serbian PlayerDainik Gomantak

FC Goa: एफसी गोवात प्रथमच सर्बियन खेळाडू; दोन वर्षांचा करार

Goa Football: द्राझिच २०२३-२४ मोसमात सायप्रसमधील एथनिकोस अचना एफसीतर्फे खेळला होता
Published on

एफसी गोवा संघाने प्रथमच सर्बियन फुटबॉलपटूस ताफ्यात सामावून घेतले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वयोगट पातळीवर सर्बियाचे प्रतिनिधित्व केलेला २८ वर्षीय मध्यरक्षक देयान द्राझिच याच्याशी दोन वर्षांचा करार करण्यात आला.

एफसी गोवाशी करार करण्यापूर्वी द्राझिच २०२३-२४ मोसमात सायप्रसमधील एथनिकोस अचना एफसीतर्फे खेळला होता. त्याने ३९ सामन्यांत सहा गोल व १४ गोल साह्य (असिस्ट) अशी कामगिरी बजावली. व्यावसायिक क्लब कारकिर्दीत द्राझिच याने ३२६ सामन्यांत ५४ गोल व ४८ असिस्टची नोंद केली आहे.

‘देयानचे एफसी गोवा संघात स्वागत करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. तो खूपच प्रतिभावान असून तांत्रिकदृष्ट्या ड्रिबलिंगमध्ये भन्नाट असून पासिंगमध्येही सरस आहे. तो अष्टपैलू असून विंगर, तसेच आक्रमक मध्यरक्षक जागी छाप पाडतो,’ असे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी नव्या खेळाडूविषयी सांगितले. वेगवेगळ्या देशांत खेळलेला असल्यामुळे तो भारतातील फुटबॉलशी सहजपणे जुळवून घेईल, असा विश्वासही मानोलो यांनी व्यक्त केला.

‘इतकी वर्षे युरोपात खेळल्यानंतर आता मी नव्या आव्हानासाठी सज्ज आहे. इंडियन सुपर लीग स्पर्धेत खेळलेल्या सर्बियातील इतर खेळाडूंकडून या लीगबाबत चांगले ऐकले आहे. एफसी गोवा संघाने माझ्यावर विश्वास दाखविला असून तो सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ असे द्राझिच म्हणाला.

Goa Football: द्राझिच २०२३-२४ मोसमात सायप्रसमधील एथनिकोस अचना एफसीतर्फे खेळला होता
FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

विविध देशांत खेळण्याचा अनुभव

सर्बियातील सोम्बोर शहरात जन्मलेल्या द्राझिच याने एफके टेलिओप्टिक संघातर्फे कारकिर्दीस सुरवात केली. नंतर स्पेनमध्ये तो ला-लिगा स्पर्धेतील सेल्टा दे व्हिगो संघातर्फे, तसेच लोन करारपद्धतीवर रेयाल व्हायाडोलिडतर्फेही खेळला. स्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरी या देशात, तसेच तुर्कस्तानमध्येही तो व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com