FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Rowllin Borges: तो ईस्ट बंगालकडूनही खेळला ३२ वर्षीय रॉलिन गतमोसमात एफसी गोवासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला.
नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा
Rowllin BorgesFC Goa X Handle

अनुभवी गोमंतकीय मध्यरक्षक रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाने कायमस्वरुपी करार केला आहे. २०२३-२४ मधील सफल कामगिरीनंतर क्लबने त्याच्यावर आगामी मोसमापूर्वी विश्वास व्यक्त केला.

रॉलिन दक्षिण गोव्यातील नुवे येथील रहिवासी असून आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावर त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत रॉलिन नॉर्थईस्ट युनायटेड, मुंबई सिटी व एफसी गोवा संघातर्फे खेळला आहे.

आय-लीग स्पर्धेत त्याने स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे कारकिर्दीस सुरवात केली. तो ईस्ट बंगालकडूनही खेळला ३२ वर्षीय रॉलिन गतमोसमात एफसी गोवासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला.

ड्युरँड कप उपांत्य फेरी गाठलेल्या, तसेच आयएसएल साखळी फेरीत तिसरा क्रमांक व करंडकाची उपांत्य फेरी गाठलेल्या एफसी गोवातर्फे तो २५ सामने खेळला व पाच गोल नोंदविले.

नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा
Goa मुख्यमंत्र्यांच्या हाती वीणा अन् चिपळ्या मिसेसच्या डोईवर तुळस; गोव्यातून पंढरपूरला निघाली वारी, पाहा फोटो

रॉलिन एफसी गोवाचा कायमस्वरुपी सदस्य बनल्याबद्दल संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी आनंद व्यक्त केला.

"आमच्या संघात दाखल झाल्यापासून तो मध्यफळीतील अविभाज्य भाग बनला आहे. तांत्रिकदृष्ट्या कौशल्यसंपन्न असलेला तो उत्कृष्ट मध्यरक्षक आहे. संघाच्या मध्य फळीतून आगेकूच राखत शानदार नेम साधण्याची त्याची क्षमता लक्षणीय असून त्याचा अनुभव संघासाठी मौल्यवान संपत्ती आहे," असे मार्केझ यांनी रॉलिनचे कौतुक करताना सांगितले.

"माझ्या घरच्या राज्यातील क्लबची कायमस्वरुपी करार केल्याने स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. क्लबच्या महत्त्वाकांक्षेत योगदान देण्यासाठी आणि गोव्याला आणखी गौरव मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे," असे एफसी गोवाचा मध्यरक्षक रॉलिन बोर्जिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com