Indian Super League: आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा अकरावा सीझन १३ सप्टेंबरपासून; एफसी गोवाचा पहिला सामना जमशेदपूरविरुद्ध

Indian Super League Season 11: मोहन बागान-मुंबई सिटी लढतीने स्पर्धेला सुरवात; एफसी गोवा स्पर्धेतील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी खेळेल
Indian Super League Season 11: मोहन बागान-मुंबई सिटी लढतीने स्पर्धेला सुरवात; एफसी गोवा स्पर्धेतील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी खेळेल
ISl 2024-25 Season 11Dainik Gomantak
Published on
Updated on

ISL 2024-25|ISl 11 Session

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमास येत्या १३ सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. कोलकता येथे गतमोसमात शिल्ड पटकावलेला मोहन बागान व करंडक विजेत्या मुंबई सिटी एफसी यांच्यात पहिला सामना होईल.

एफसी गोवा स्पर्धेतील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळेल. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. मोहन बागान विरुद्ध मुंबई सिटी यांच्यात १३ सप्टेंबरला होणारा सामना गतमोसमातील करंडक अंतिम लढतीची पुनरावृत्ती असेल.

मोहम्मेडन स्पोर्टिंग स्पर्धेतील नवा संघ

कोलकत्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील नवा संघ असून त्यांच्या सहभागाने स्पर्धेतील संघांची संख्या १३ झाली आहे. त्यांचे आयएसएल पदार्पण कोलकत्यातील किशोर भारती क्रीडांगणावर १६ सप्टेंबर रोजी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या लढतीने होईल. गतमोसमात आय-लीग स्पर्धा जिंकून मोहम्मेडन स्पोर्टिंगने आयएसएल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. त्यांच्यासह आता आयएसएलमधील कोलकत्यातील संघांची संख्या तीन झाली आहे. मोहन बागान व ईस्ट बंगाल हे या शहरातील अन्य संघ आहेत.

हैदराबादला क्लब परवाना आवश्यक

हैदराबाद एफसी संघाच्या यावेळच्या आयएसएल सहभागाबद्दल अजूनही संभ्रम आहे. आयएसएल वेळापत्रक जाहीर करताना या संघाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तरीही हैदराबादच्या सामन्यांचे वेळापत्रक एआयएफएफ क्लब परवाना मंजुरीवर अवलंबून असल्याचे आयएसएल आयोजकांनी स्पष्ट केले आहे. हैदराबाद एफसीने सध्या सुरू असलेल्या १३३व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतूनही ऐनवेळी माघार घेतली होती.

Indian Super League Season 11: मोहन बागान-मुंबई सिटी लढतीने स्पर्धेला सुरवात; एफसी गोवा स्पर्धेतील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी खेळेल
ISL 2021: पुन्हा एकदा ईशान `लकी सुपर सब` एफसी गोवाने पिछाडीवरून इंज्युरी गोलमुळे चेन्नईयीनला रोखले

आयएसएल स्पर्धेतील संघ

बंगळूर एफसी, चेन्नईयीन एफसी, एफसी गोवा, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, मुंबई सिटी, नॉर्थईस्ट युनायटेड (गुवाहाटी), ओडिशा एफसी, पंजाब एफसी, तसेच मोहन बागान, ईस्ट बंगाल, मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब (तिन्ही संघ कोलकता).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com