Goa Ranji team Coach: 2003 वर्ल्डकपमधील टीम इंडियातील खेळाडू गोवा रणजी क्रिकेट संघाचा कोच

Goa Ranji Team: ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीची गुरुवारी बैठक झाली, त्यावेळी निवडीवर शिक्कामोर्तब झाले
Goa Ranji Team: ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीची गुरुवारी बैठक झाली, त्यावेळी निवडीवर शिक्कामोर्तब झाले
Dinesh Mongia, JP YadavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, पंजाबचे अष्टपैलू दिनेश मोंगिया यांची गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) २०२४-२५ मोसमासाठी रणजी व सीनियर क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीची गुरुवारी बैठक झाली, त्यावेळी निवडीवर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली.

भारताचे आणखी एक माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू जेपी (जयप्रकाश) यादव यांची जीसीएने २३ वर्षांखालील संघांच्या प्रशिक्षकपद निवड केली. यादव यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश व रेल्वेतर्फे खेळले आहेत. याशिवाय १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी गोव्याचे माजी कर्णधार सगुण कामत यांना कायम राखण्यात आले असून माजी रणजीपटू राहुल केणी १६ वर्षांखालील, तर रॉबिन डिसोझा १४ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक असतील. प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. गतआठवड्यात मुलाखत घेण्यात आली, त्यानंतर गुरुवारी निवडीचा निर्णय झाला, असे रोहन यांनी नमूद केले.

अर्जुन, सिद्धार्थ, रोहन ‘पाहुणे’

जीसीएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत आगामी मोसमासाठी ‘पाहुणे’ (व्यावसायिक) क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला सलग तिसऱ्या मोसमासाठी, तर कर्नाटकचा के. व्ही. सिद्धार्थ याला दुसऱ्या मोसमासाठी कायम राखले. कर्नाटकचाच रोहन कदम संघातील नवा पाहुणा आहे. तो गतमोसमात डच्चू देण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठी याची जागा घेईल, असे रोहन गावस देसाई यांनी नमूद केले.

कर्नाटक स्पर्धेचे आमंत्रण

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने गोव्याला आगामी डॉ. (कॅप्टन) के. थिम्मप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी निमंत्रित केले आहे, अशी माहिती रोहन गावस देसाई यांनी दिले. चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेला चार सप्टेंबरपासून सुरवात होईल. ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. गोव्याचा अ गटात समावेश असून यजमान कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड हे अन्य संघ आहेत. अन्य गटात तमिळनाडू, विदर्भ, महाराष्ट्र, मुंबई, आंध्र, गुजरात, बडोदा, ओडिशा, तसेच डॉ. डी. वाय.पाटील अकादमी असे मातब्बर संघ आहेत.

Goa Ranji Team: ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीची गुरुवारी बैठक झाली, त्यावेळी निवडीवर शिक्कामोर्तब झाले
Goa Cricket Association: खोर्ली इलेव्हनने पटकावले राज्यस्तरीय 'विजेतेपद'; फायनलमध्ये आर्ले क्लबचा उडवला धुव्वा

क्रिकेटमधील दीर्घानुभवी

डावखुरा फलंदाज व डावखुरा फिरकी गोलंदाज असलेले ४७ वर्षीय दिनेश मोंगिया भारताकडून २००१-२००७ या कालावधीत ५७ एकदिवसीय, तर एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ते १९९५-९६ ते २००७ या कालावधीत १२१ सामने खेळले व ८०२८ धावा केल्या. २००३ एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक उपविजेत्या आणि २००२ मधील चँपियन्स करंडक विजेत्या भारतीय संघात दिनेश यांचा समावेश होता.

४९ वर्षीय जेपी यादव भारताकडून २००२ ते २००५ या कालावधीत १२ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले. ते फलंदाज व उपयुक्त मध्यमगती गोलंदाज होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९९४-९५ ते २०१३ या कालावधीत ते १३० सामन्यांत खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २९६ गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com