Ultimate Table Tennis: धेंपो गोवा चॅलेंजर्सची विजयी घोडदौड कायम, पुणे जॅग्वार्स संघाचा 8-7 ने पराभव

Dempo Goa Challengers vs Pune Jaguars: धेंपो गोवा चॅलेंजर्सने विजयी घोडदौड राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत पुणे जॅग्वार्स संघाला ८-७ असे हरविले.
Ultimate Table Tennis
Ultimate Table TennisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) स्पर्धेतील दोन वेळच्या माजी विजेत्या धेंपो गोवा चॅलेंजर्सने विजयी घोडदौड राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत पुणे जॅग्वार्स संघाला ८-७ असे हरविले. स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे.

रुमानियाची बर्नाडेट सोक्स, उदयोन्मुख भारतीय खेळाडू सिंड्रेला दास धेंपो गोवा संघासाठी विजयाच्या शिल्पकार ठरल्या. दोघींनीही महिलांच्या एकेरीत शानदार खेळत करत विजयाची नोंद केली. दोन्ही पुरुष एकेरीत, तसेच मिश्र दुहेरीत हार पत्करूनही बर्नाडेट व सिंड्रेला यांनी जिंकलेल्या गेम्समुळे धेंपो गोवा संघाला पराभव टाळता आला.

Ultimate Table Tennis
Goa Section 39A: कलम '39ए' चे भूत सत्ताधीशांच्या मानगुटीवर बसेल!

निकाल ः धेंपो गोवा चॅलेंजर्स वि. वि. पुणे जॅग्वार्स ८-७ ः पी. बी. अभिनंद पराभूत वि. ओमर अस्सार १-२, बर्नाडेट सोक्स वि. वि. प्रिथिका पावडे ३-०, अल्वारो रॉबलेस व सिंड्रेला दास पराभूत वि. अनिरबन घोष व दिया चितळे १-२, अल्वारो रॉबलेस पराभूत स्नेहित सुरावाज्जुला १-२, सिंड्रेला दास वि. वि. दिया चितळे २-१.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com