Cooch Behar Trophy: गोव्याची भेदक गोलंदाजी! केरळला स्वस्तात गुंडाळले; कर्णधार यश, समर्थचा प्रभावी मारा

Goa Vs Kerala: केरळमधील तिरुअनंतपुरम्‌ येथे एलिट ‘अ’ गट चार दिवसीय सामन्यास शुक्रवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवसअखेर गोव्याने बिनबाद १५ धावा केल्या.
Goa Vs Kerala
Goa Vs KeralaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फिरकी गोलंदाज कर्णधार यश कसवणकर (४-४१) व वेगवान गोलंदाज समर्थ राणे (४-५८) यांनी प्रभावी मारा करताना कर्नल कुचबिहार करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात केरळचा पहिला डाव २५५ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.

केरळमधील तिरुअनंतपुरम्‌ येथे एलिट ‘अ’ गट चार दिवसीय सामन्यास शुक्रवारपासून सुरवात झाली. पहिल्या दिवसअखेर गोव्याने बिनबाद १५ धावा केल्या. ते अजून २४० धावांनी मागे आहेत. गोव्याने नाणेफेक जिंकून केरळला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. स्पर्धेतील रद्द झालेला एक सामना वगळून इतर चार लढतीत प्रत्येकवेळी प्रतिस्पर्ध्यांसमोर नांगी टाकणारा गोव्याचा संघ शुक्रवारी वर्चस्व राखताना दिसला.

शतकवीर शॉन रॉजर (१०१) व अर्धशतकवीर वरुण नयनार (६४) यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे केरळचा संघ सुस्थितीत होता. यश याने वरुणला पायचीत बाद केल्याने तिसऱ्या विकेटची १३० धावांची भागीदारी भंग झाली. पुढच्याच चेंडूवर यशने अहम्मद इम्रान याला यष्टीरक्षक नित्यय कुंकळीकर याच्याकरवी झेलबाद केले.

Goa Vs Kerala
Cooch Behar Trophy: गोव्याचा निराशाजनक शेवट! मध्य प्रदेशविरुद्ध 3 दिवसांतच पराभूत; चांगल्या सुरुवातीनंतर कामगिरी घसरली

शॉन यालाही यश यानेच बाद केले. केरळने २ बाद १७४ या सुस्थितीतून आठ विकेट्स ८१ धावांत गमावल्या, त्यामुळे त्यांचा डाव अडीचशे धावांत गुंडाळणे गोव्याला शक्य झाले. समर्थने केरळचे शेपूट जास्त वळवळणार नाही याची दक्षता घेतली.

Goa Vs Kerala
Cooch Behar Trophy 2025: गोव्याने वर्चस्वाची संधी गमावली! मध्य प्रदेश 157 धावांनी आघाडीवर; समर्थ राणेचे 4 बळी

संक्षिप्त धावफलक

केरळ, पहिला डाव : ८५.४ षटकांत सर्वबाद २५५

(वरुण नयनार ६४,

शॉन रॉजर १०१, ए. जिष्णू २७,

चिगुरुपती व्यंकट १०-२-३१-०, समर्थ राणे १४.४-०-५८-४, कौस्तुभ पिंगुळकर १७-२-५४-१, अनुज यादव २७-६-६७-१, यश कसवणकर १७-२-४१-४).

गोवा, पहिला डाव : २ षटकांत बिनबाद १५ (विराज नाईक नाबाद १०, शार्दुल शेट नाबाद ४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com