C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

Goa Vs Jharkhand: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटातील पहिल्याच लढतीत गोव्याला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
Goa Ranji Cricket
Goa Ranji Cricket Match Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटातील पहिल्याच लढतीत गोव्याला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. झारखंडने त्यांच्यावर डाव व ११३ धावांनी एकतर्फी विजय नोंदविला.

चार दिवसीय सामना रविवारी जमशेदपूर येथील कीनन स्टेडियमवर संपला. सामना डावाच्या फरकाने जिंकल्यामुळे झारखंडला बोनससह एकूण सात गुण प्राप्त झाले. ३६९ धावांच्या पिछाडीनंतर गोव्याने शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १०९ असे दमदार प्रत्युत्तर दिले होते.

परंतु रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसरा डाव ५ बाद १५५ असा कोसळल्यानंतर गोव्याला पराभव टाळणे शक्य झाले नाही. अमन धूपर (५२) व लखमेश पावणे (नाबाद ३८) यांनी खिंड लढविल्यामुळे गोव्याला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. त्यापूर्वी, कालची नाबाद जोडी देवनकुमार चित्तेम (४९) व आयुष वेर्लेकर (४७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली.

Goa Ranji Cricket
Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गोव्याचा स्पर्धेतील पुढील चार दिवसीय सामना २६ ऑक्टोबरपासून गुजरातविरुद्ध पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल.

Goa Ranji Cricket
Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव : १८३ व दुसरा डाव (१ बाद १०९ वरून) : ८५.२ षटकांत सर्वबाद २५६ (देवनकुमार चित्तेम ४९, आयुष वेर्लेकर ४७, आर्यन नार्वेकर ४, शिवेंद्र भुजबळ ०, अमन धूपर ५२, लखमेश पावणे नाबाद ३८, दीप कसवणकर ०, अनुज यादव १०, विनायक कुंटे ५, रुद्रेश शर्मा ०, रौनक २-२५, शुभ शर्मा २-२६, कौनैन कुरेशी ३-६०, शमशाद ३-५३) पराभूत वि. झारखंड, पहिला डाव : ८ बाद ५५२ घोषित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com