BCCI Election: 'बीसीसीआय' पद राखण्यात रोहन देसाई यांना अपयश! उमेदवारीच्‍या शर्यतीतून पडले बाहेर

Rohan Desai BCCI Election: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) माजी सचिव रोहन गावस देसाई बीसीसीआयच्या आगामी पदाधिकारी निवडणुकीतून बाहेर पडले आहेत.
Rohan Desai
Rohan DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) माजी सचिव रोहन गावस देसाई यांच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिवपद सात महिन्‍यांचे अल्पकालीन ठरले. जीसीए निवडणुकीतील त्यांच्या गटाचे अपयश, तसेच बीसीसीआय प्रतिनिधित्वासाठीची कायदेशीर लढाई या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या आगामी पदाधिकारी निवडणुकीतून ते बाहेर पडले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, येत्या २८ सप्टेंबर रोजी नियोजित असलेल्या बीसीसीआय निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज रविवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुदत होती. यावर्षी १ मार्च रोजी बीसीसीआय संयुक्त सचिवपदी बिनविरोध ठरलेले रोहन गावस देसाई यांना आणखी एका मुदतीसाठी संधी मिळण्याचे संकेत होते.

परंतु ठरलेल्या कालावधीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. बीसीसीआयच्या आगामी निवडणुकीतील कोणत्याही जागेसाठी रोहन यांना संधी मिळालेली नाही.

Rohan Desai
Goa Roads: "रस्त्यावर खड्डा दिसला की फोन करा, 24 तासांत दुरुस्त करतो", मंत्री कामतांनी दिली गोवेकरांना Guarantee

रोहन यांच्या जीसीए प्रतिनिधित्वाला आव्हान देणारी याचिका शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आली होती. ‘‘मी बीसीसीआयमध्ये वैयक्तिक नव्हे, तर गोवा क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करत होतो. आता सध्याच्या समितीने गोव्याला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत एवढेच माझे म्हणणे आहे’’ असे रोहन म्हणाले.

Rohan Desai
Goa Crime: मद्यप्राशन करुन चाकूने केले वार, बायणा येथे 64 वर्षीय महिलेची हत्या; आरोपी अटकेत

होय, मी बीसीसीआय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. मला तशी सूचना मिळाली नाही. नेमके कारण मी सांगू शकत नाही, तरीही कायदेशीर प्रक्रियेमुळे मला संधी मिळाली नसावी. - रोहन गावस देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com