VIDEO: पाकच्या 'बाबर'ने तोडला 'अभिषेक शर्मा'चा विक्रम, केली तुफान फटकेबाजी; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Babar Azam Funny Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Babar Azam | Abhishek Sharma
Babar Azam | Abhishek Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी फलंदाज सराव सत्रात फलंदाजी करताना दिसत असून, स्टार फलंदाज बाबर आझम जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळतो.

नेट प्रॅक्टिसमध्ये बाबरने मारलेल्या आक्रमक फटक्यांनी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्सनी बाबरच्या फटकेबाजीचे कौतुक केले, तर काहींनी उपहासात्मक कॅप्शन देत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली.

विशेष म्हणजे, “बाबरने नुकताच अभिषेक शर्माचा १४ चेंडूत ५० धावांचा विक्रम मोडला, पण तो फक्त नेटमध्येच” अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने नुकतेच T20 सामन्यात १४ चेंडूत अर्धशतक झळकावून विक्रम केला , ज्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

Babar Azam | Abhishek Sharma
Abhishek Sharma: 14 चेंडूत 50 धावा, तरी युवराज सिंग अभिषेक शर्मावर नाराज; म्हणाला, "अजून जमले नाही....."

त्या पार्श्वभूमीवर बाबरच्या सरावातील व्हिडीओवरून सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सूरही दिसून येत आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांमध्ये अशा व्हायरल व्हिडीओंवरून सोशल मीडिया चर्चांना उधाण येत असून, आगामी सामन्यांमध्ये बाबर आझमचा प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com