Abhishek Sharma: 14 चेंडूत 50 धावा, तरी युवराज सिंग अभिषेक शर्मावर नाराज; म्हणाला, "अजून जमले नाही....."

Yuvraj Singh Abhishek Sharma Post: भारतीय क्रिकेट संघाच्या युवा फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळलेली विस्फोटक खेळी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
Yuvraj Singh
Yuvraj SinghDainik Gomantak
Published on
Updated on

गुवाहाटी : भारतीय क्रिकेट संघाच्या युवा फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळलेली विस्फोटक खेळी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. भारताच्या दिग्गज फलंदाज युवराज सिंह यांनाही या खेळीवर प्रतिक्रिया द्यावी लागली. “अजून १२ चेंडूत अर्धशतक करू शकला नाहीस? छान खेळलास, असेच पुढे जात राहा,” असा ट्विट करत युवराज यांनी अभिषेकचे कौतुक केले.

बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने केवळ १४ चेंडूत अर्धशतक झळकावले. ही भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान फिफ्टी ठरली. त्याने २० चेंडूत नाबाद ६८ धावा करत भारताला आठ गडी राखून सहज विजय मिळवून दिला. या डावात त्याने पाच चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली.

यापूर्वी हार्दिक पांड्याने १६ चेंडूत अर्धशतक केले होते, तर २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध युवराज सिंह यांनी १२ चेंडूत केलेले अर्धशतक आजही विक्रम म्हणून कायम आहे. अभिषेकच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये ९४ धावा करत सामना एकतर्फी केला.

Yuvraj Singh
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा बनणार नवा 'सिक्सर किंग'! 'हिटमॅन'चा मोठा विक्रम धोक्यात, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

सामन्यानंतर अभिषेक म्हणाला, “संघाला माझ्याकडून अशीच फलंदाजी अपेक्षित आहे. प्रत्येक वेळी ते शक्य नसले तरी मानसिक तयारी आणि ड्रेसिंगरूमचे वातावरण खूप मदत करते.” त्याने आपल्या आक्रमक शैलीबद्दल सांगताना म्हटले, “पहिल्याच चेंडूपासून मोठा फटका मारण्याचा उद्देश नसतो, तर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण पाहून नैसर्गिकपणे निर्णय घेतो.”

Yuvraj Singh
IND vs NZ: 'तू इंडियासाठी खेळण्यास लायक आहे का?' धडाकेबाज खेळीनंतर ईशान किशननं सांगितला स्वतःला सिद्ध करण्याचा थरार

या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडवर ३-० अशी मालिका जिंकली असून, आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी अभिषेक शर्मा भारतीय संघासाठी उदयोन्मुख आक्रमक फलंदाज म्हणून पुढे येत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com