Goa Cricket: आंध्र प्रदेशचे गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व; पहिला डाव ७ बाद ४२२ धावांवर घोषित

U19 Cricket Cup: दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा गोव्याची ३ बाद ३७ धावा अशी घसरण उडाली होती
U19 Cricket Cup: दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा गोव्याची ३ बाद ३७ धावा अशी घसरण उडाली होती
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित संघांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या पहिल्या दिवशी रविवारी आंध्र प्रदेशने गोव्यावर वर्चस्व राखले. सामन्याला अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर सुरवात झाली.

आंध्र प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी पहिला डाव ७ बाद ४२२ धावांवर घोषित केला. टी. वरुण सात्विक (१६६ धावा, २२८ चेंडू, १७ चौकार, ५ षटकार) व मुव्वाला युवान (१०१ धावा, ५२ चेंडू, ९ चौकार, ७ चौकार) यांनी दणदणीत शतके ठोकताना गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यामुळे २ बाद १ धाव या नाजूक स्थितीतील सुरवातीनंतर आंध्रला सावरला आले. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा गोव्याची ३ बाद ३७ धावा अशी घसरण उडाली होती.

U19 Cricket Cup: दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा गोव्याची ३ बाद ३७ धावा अशी घसरण उडाली होती
Goa Cricket: गोव्याच्या मुलींची तमिळनाडूत विजयी झेप! अंतिम लढतीत यजमान संघास सहा विकेटने हरवले

संक्षिप्त धावफलक ः आंध्र प्रदेश, पहिला डाव ः ७८.३ षटकांत ७ बाद ४२२ घोषित(टी. वरुण सात्विक १६६, मुव्वाला युवान १०१, जी. मनवित रेड्डी ५६, बी. प्रणव रेड्डी नाबाद ४१, पुंडलिक नाईक १२-३-५२-१, समर्थ राणे १३-२-५८-२, शमिक कामत ५.३-०-३९-१, अनुज यादव १६-०-९९-०, मिहीर कुडाळकर १६-०-९३-१, यश कसवणकर १६-२-६७-२).

गोवा, पहिला डाव ः १९ षटकांत ३ बाद ३७ (आराध्य गोयल नाबाद १०, शंतनू नेवगी १८, निसर्ग नागवेकर १, समर्थ राणे ०, दिशांक मिस्कीन नाबाद ०, प्रदीप रेड्डी १-१२, राजेश नल्लपू २-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com