सासष्टी: सालसेत बॅडमिंटन क्लबतर्फे नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये येत्या १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत अखिल गोवा राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण ३.६५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
राज्यातील सर्वाधिक बक्षीस रकमेची ही बॅडमिंटन स्पर्धा असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष सिद्धार्थ रेवणकर यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
सालसेत बॅडमिंटन क्लबची २०२१ साली स्थापना झाली. स्पर्धा ‘व्हिजन गोवा’चे संयोजक उद्योजक चिराग दत्ता नायक यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेत राज्यभरातील तीनशे बॅडमिंटनपटू भाग घेतील.
स्पर्धा मुलगे व मुलींत ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील व १७ वर्षांखालील वयोगटात खेळली जाईल. यापैकी ११ वर्षांखालील व १३ वर्षांखालील स्पर्धा बिगरमानांकित असेल. १५ व १७ वर्षांखालील स्पर्धा मानांकनप्राप्त असल्याची माहिती क्लबचे कार्यकारी सदस्य शर्मद महाजन यांनी दिली.
प्रवेशिका १४ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येतील, तर १५ ऑगस्ट रोजी स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात येईल. ज्या खेळाडूंना स्पर्धा शुल्क भरणे शक्य नाही त्यांना मोफत प्रवेश दिला जाईल, अशी माहितीही देण्यात आली.
सालसेत बॅडमिंटन क्लब होतकरू बॅडमिंटपटूंची गुणवत्ता हेरून त्यांना प्रशिक्षण देते, कार्यशाळा घेते, आंतरराज्य कार्यक्रम आखत असल्याची माहिती सचिव संतोष लोटलीकर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.