World Cup 2027: 'विराट-रोहितने वर्ल्ड कप खेळू नये', KKR च्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ; चाहत्यांना धक्का!

Virat Kohli-Rohit Sharma: टीम इंडियाचे दोन मोठे सुपरस्टार्स रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळताना चाहत्यांना पाहायचे आहे.
Virat Kohli-Rohit Sharma
Virat Kohli-Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rahmanullah Gurbaz Statement: टीम इंडियाचे दोन मोठे सुपरस्टार्स रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळताना चाहत्यांना पाहायचे आहे. दोघेही सध्या आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असून वनडे क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हे दोघे नक्कीच खेळतील, असे मानले जात आहे.

मात्र, कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेल्या अफगाणिस्तानच्या दमदार फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने एका विधानामुळे क्रिकेट जगताला चकित केले. रोहित आणि विराटने पुढील वर्ल्ड कप खेळू नये, असे त्याचे मत आहे.

'रोहित-विराट वर्ल्ड कप न खेळल्यास प्रतिस्पर्ध्यांसाठी चांगले'

रहमानुल्लाह गुरबाजने 'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत रोहित आणि विराट यांच्या 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) खेळण्याच्या शक्यतेवर आपले मत मांडले. गुरबाज म्हणाला, "एक अफगाणिस्तानी खेळाडू म्हणून मला आनंद होईल जर ते दोघे संघात नसतील. जर ते दोघे टीममध्ये नसतील, तर आम्हाला भारताला हरवण्याचा एक चान्स मिळेल." तो पुढे म्हणाला, "ते दोघेही दिग्गज आहेत. विराट आणि रोहितला कोणताही संघ आपल्या टीममध्ये ठेवू इच्छितो. मात्र, जर हे दोघे संघात नसतील, तर विरोधी संघ नक्कीच आनंदी होतील."

गुरबाजच्या या विधानावरुन हे स्पष्ट होते की, विराट आणि रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती दबदबा आहे आणि त्यांची उपस्थिती प्रतिस्पर्धी संघांसाठी किती चिंतेची बाब आहे.

Virat Kohli-Rohit Sharma
T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

विराटसोबतचे खास नाते

या मुलाखतीत गुरबाजने विराट कोहलीसोबतच्या आपल्या खास नात्याबद्दलही सांगितले. अडचणीच्या वेळी तो विराटची मदत घेतो, असे त्याने सांगितले. गुरबाज म्हणाला, "जेव्हा मी अडचणीत असतो आणि मला मदतीची गरज असते, तेव्हा मी विराट भाईला कॉल करतो. आम्ही बोलतो. जेव्हा गरज असते, तेव्हा आमचे बोलणे होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी धावा करु शकत नव्हतो, तेव्हा मी त्याला कॉल केला आणि पुढच्याच सामन्यात मी जवळपास 90धावा केल्या.'' याचा अर्थ विराट कोहलीचा सल्ला त्याच्यासाठी किती मोलाचा ठरतो, हे त्याने स्पष्ट केले.

Virat Kohli-Rohit Sharma
T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

रोहित-विराटचा अलीकडील दमदार फॉर्म

रोहित आणि विराट यांचे वनडे क्रिकेटमधील पुनरागमन जबरदस्त राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने 73 धावा, तर तिसऱ्या वनडे सामन्यात 121 धावांची नाबाद शतकी खेळी खेळली होती. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Afirca) रांची वनडे सामन्यातही रोहितने 57 धावांची शानदार खेळी खेळली. दुसरीकडे, विराटने गेल्या दोन वनडे सामन्यांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 74 धावांची नाबाद खेळी खेळली, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 135 धावांची तूफानी खेळी खेळली. दोघांचाही हा शानदार फॉर्म पाहता, 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांचा सहभाग जवळपास निश्चित मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com