झिंक फॉस्फाइड; एक नवा जीवघेणा धोका

Zinc Phosphide Poisoning: मृत्यूचा सापळा नेहमीच बंदुकीत किंवा बॉम्बमध्ये दडलेला असतो असे नाही. कधी तो सहज उपलब्ध असलेल्या एका विषारी पदार्थातही लपलेला असतो.
Zinc Phosphide Poisoning
Zinc Phosphide PoisoningDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. ऑस्कर रिबेलो

मृत्यूचा सापळा नेहमीच बंदुकीत किंवा बॉम्बमध्ये दडलेला असतो असे नाही. कधी तो सहज उपलब्ध असलेल्या एका विषारी पदार्थातही लपलेला असतो. ‘झिंक फॉस्फाइड’च्या चर्चेने नेमकी हीच भीती अधोरेखित केली आहे.

केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल (जी दिसायला अगदी सामान्य वाटते) तिने क्रौर्याची सीमा पार करून केलेला खून आणि त्याच वेळी राम मंदिरच्या विश्वस्तांनी केलेला कुटिल चोरीचा प्रकार, ज्यामुळे लाखो लोकांचा विश्वास डळमळीत झाला, या गोष्टींनी आपले लक्ष वेधून घेतले आहे. पण, याच गर्दीत आणखी एक घटना घडली आहे, जी कदाचित टीव्हीवरील ‘प्राइम टाईम’च्या गोंधळात हरवून जाईल, अशी मला भीती वाटते.

Zinc Phosphide Poisoning
Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

फैयाज प्रेमजी नावाच्या एका मनोरुग्णाने गोळ्यांमध्ये ‘झिंक फॉस्फाइड’ (उंदरांचे विष, जे सहज उपलब्ध असते) मिसळले आणि मुंबईतील मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो लोकांना ते वाटले, जेणेकरून त्यांचा जीव घेता येईल. अर्थात, त्याच्या गुन्हेगारी आणि कुटिल मनाची ही केवळ एक विकृत लहर होती. काही लोकांनी ते ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध’ समजून खाल्लेही; पण सुदैवाने त्याआधीच गोंधळ उडाला आणि प्रेमजीला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ‘वेपन-ग्रेड’ (घातक शस्त्रासारखे प्रभावी) झिंक फॉस्फाइडचा साठा सापडला.

या दोन निर्विवाद गोष्टी आहेत... आपल्या देशात झिंक फॉस्फाइड किंवा उंदरांचे विष ‘वडापाव’इतकेच सहज उपलब्ध आहे. आणि... झिंक फॉस्फाइड पोटात गेल्यास मृत्यू अटळ असतो (काही अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता) आणि वैद्यकीय क्षेत्रातील आम्ही लोक त्याबाबत काहीही करू शकत नाही.

मुळात हे विष पेशींचा ऑक्सिजन पुरवठा खंडित करते आणि ‘मायटोकॉन्ड्रिया’मध्ये (पेशींच्या ऊर्जा केंद्रात) प्रवेश करून यकृत, फुफ्फुसे आणि हृदयाचा अतिशय वेगाने नाश करते.

ते जीव घेते!! त्यातून सुटका नाही!!!

मला आजही आठवते, ‘जीएमसी’मधील माझ्या दिवसांत, असेही काही महाभाग पाहण्‍यात आले - ती तरुण मुले-मुली आत्महत्येसाठी याचा वापर करायची. मग, स्वतःच्या कृतीचा पश्चात्ताप झाल्यावर, आम्हाला त्यांना वाचवण्यासाठी विनवणी करायचे- त्या दुर्दैवी प्रेमीयुगुलांचे (बहुतेकदा ते प्रेमीच असायचे) ते भयावह, हताश डोळे माझ्या स्मरणात कायम राहिले.

ऑर्गानो-फॉस्फरस कीटकनाशके, झोपेच्या गोळ्यांचा अति-डोस किंवा इतर व्यसनाधीन पदार्थांच्या अतिसेवनावर उपाय उपलब्ध आहेत. पण, उंदरांच्या विषावर काहीही उपाय नाही. ती एक प्रकारे मृत्यूची शिक्षाच असते. मला इथे हेच सांगायचे आहे की, प्रेमजीने आता धोक्याची पातळी आणखी वाढवली आहे. आत्महत्येपासून थेट हत्येपर्यंत!! आणि तीही सामूहिक हत्या.

जर ही घटना इतकी भयानक नसती, तर यावर अगाथा ख्रिस्टीच्या शैलीतील एक उत्कृष्ट कादंबरी लिहिता आली असती. तर, हे माझे तीन मोजके मुद्दे आहेत -

प्रत्येक देशात उंदरांच्या विषाच्या (पेस्टच्या) विक्रीबाबत अत्यंत कडक नियम आहेत. चीनसह आशियातील बहुतेक देशांनी यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. पाश्चात्य लोकशाही देशांमध्ये, विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ग्रॅमची नोंद ठेवली जाते, त्याचा मागोवा घेतला जातो. तसेही, पाश्चात्य लोकशाही देशांनी आता बंदुका वापरून मोठ्या प्रमाणावर हत्या करण्याकडे प्रगती केली आहे... उंदराचे विष वापरणे आता खूपच ‘जुनाट’ किंवा कंटाळवाणे वाटू लागले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, या प्रेमजीच्या हाती कित्येक किलो ‘झिंक फॉस्फाइड’ (उंदराचे विष) लागले होते. आपण झुरळांना मारण्याच्या किंवा वाचवण्याच्या वादात मग्न असताना, हा ‘महाभाग’ मात्र माणसांचा जीव घेण्याच्या तयारीत होता! आणि हो, प्रेमजी आपल्यासारख्या लोकांवर नाही तर स्वतःच्याच समाजातील लोकांना लक्ष्य करत होता, म्हणूनच आपल्याला याबद्दलच्या बातम्या किंवा टीव्ही अँकर्सचा दररोजचा आरडाओरडा नकोसा वाटला असावा!

Zinc Phosphide Poisoning
Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

मी फक्त विचारतोय बरं का!

झिंक फॉस्फाइड हे ‘बायो-टेररिझम’ अर्थात जैविक दहशतवादासाठी वापरले जाऊ शकणारे उत्पादन आहे. यात काहीच वाद नाही. ते सहज उपलब्ध होते, त्याची चव थोडी कडू असते, त्याला जवळजवळ वास नसतोच आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते कधीच त्वरित जीव घेत नाही. एखाद्याने तुमच्या अन्नात हे विष मिसळले असेल, तर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने तुमचा मृत्यू होऊ शकतो आणि कोणालाही संशय येणार नाही. त्यामुळे, प्रेमजीच्या गोळ्या ज्या दुर्दैवी लोकांनी घेतल्या, त्यांच्यावर अजूनही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हे सर्व यासाठी की, याच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालणारा किंवा किमान कडक नियम व देखरेख करणारा कायदा आपण आणू शकू!!!

एक कल्पना करून पाहा - समजा तुम्हाला एखाद्या राजकारण्याला किंवा मंत्र्याला संपवायचे आहे. तुम्हाला फक्त त्‍याच्‍या भोजनात थोडे उंदराचे विष मिसळायचे आहे आणि काम फत्ते! अर्थात, या प्रकरणात ते महाशय कायमचे संपलेले असतील...

समाजातील अधिकाधिक असमाधानी लोकांच्या मनात प्रेमजीसारखे विचार येण्याआधीच... ‘झिंक फॉस्फाइड’वर आताच्या आता बंदी घातलीच पाहिजे. ‘ते’ जीवघेणे आहे. ‘ते’ धोकादायक आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या विक्षिप्त माणसाला हे समजले आहे की याचा वापर करून हत्या करता येते. लोकांनो, जागे व्हा आणि लसणाचा वास घ्या. कारण ‘झिंक फॉस्फाइड’चा वास अगदी तसाच असतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com