Vasco Goa
Vasco GoaDainik Gomantak

Vasco: सफर गोव्याची! पोर्तुगीज काळात व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले, गोव्यातील महत्त्वाचे बंदर 'वास्को'

Vasco Goa: वास्को हे माझे गाव. शहरीकरणामुळे गावचा रागरंगच नव्हे रूपही बदलले आहे. शहराचे नाव पोर्तुगीज संशोधक वास्को द गामा यांच्या नावावरून ठेवले आहे.
Published on

वास्को हे माझे गाव. शहरीकरणामुळे गावचा रागरंगच नव्हे रूपही बदलले आहे. शहराचे नाव पोर्तुगीज संशोधक वास्को द गामा यांच्या नावावरून ठेवले आहे. आताही या शहराला छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाचे स्मरण रहावे, यासाठी शहराला संभाजीनगर असे नाव द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

पोर्तुगीज काळात वास्को हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. गोव्यातील सर्वात विकसित शहरी भागांपैकी एक असे शहर आहे. शहरात विविध संस्कृतींचा संगम दिसतो. शहरात मराठी, कोकणी, पोर्तुगीज भाषांतून संवाद होतो.

मुंडवेल भागात माझे बालपण गेले. बालपणीच्या आठवणी खूप दाटून येतात. वास्को राज्यातील एक महत्त्वाचे बंदर शहर आहे. हे शहर दक्षिण गोव्यात मुरगाव तालुक्यात स्थित असून व्यापार, पर्यटन आणि नौकानयनासाठी प्रसिद्ध आहे.

वास्कोचे दैवत श्री देव दामोदराच्या आराधनेसाठी होणारा वास्को सप्ताह ही आमच्यासाठी पर्वणी असते. आमची आजी आम्हाला लहानपणी फेरीत घेऊन जायची. विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने पाहून हरखून जायचो.

चित्ररथ पहायला मजा यायची. पण आजच्या गोंगाटाच्या शहरी वातावरणात ती मजा कुठेतरी हरवत चाललीय, असे वाटते. वास्को हे औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे, त्यामुळे देशातील विविध भागातून कामगारांचे लोंढे वास्कोकडे येत आहेत. त्यामुळे लोकवस्तीही वाढते आहे.

वास्को शहर पणजीपासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. येथे वास्कोला रेल्वे स्टेशन आहे, जे गोव्याचे एक प्रमुख रेल्वे केंद्र आहे. शिवाय दाबोळी विमानतळ जवळच आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक याच विमानतळावरून गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी दाखल होतात.

किंवा मुरगाव बंदर जवळ असल्यामुळे मोठमोठाली प्रवाशी जहाजे देखील येथे दाखल होतात. शिवाय वास्को हे सर्वात मोठे बंदराचे शहर असून हे गोव्याचे प्रमुख औद्योगिक व व्यापार केंद्र मानले जाते.

Vasco Goa
Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

मुरगाव पोर्ट अथॉरिटीद्वारे येथे मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होते. लोखंड खनिज निर्यातीसाठी हे बंदर प्रसिद्ध आहे.गावातील जीवन अतिशय सुखमय होते, पण विकासाच्या नावावर चाललेले निसर्गाचे विदृपीकरण सहन होत नाही. प्रदूषणामुळे शहर परिसराला व्यापले आहे. त्यामुळे जगणेही मुश्‍किल होत आहे.

वास्को परिसरातील जपानी गार्डन समुद्र दृश्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्यटकांची रिघ जपानी गार्डन पाहण्यासाठी लागलेली असते.

Vasco Goa
Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

याशिवाय मुरगाव किल्ला ऐतिहासिक स्थळ असून येथेही पर्यटकांची वर्दळ असते.

शांत व सुंदर समुद्रकिनारा लाभलाय तो बोगमाळो किनाऱ्याचा. औद्योगिक विकास आणि पर्यटन यांचा समतोल साधत विकास करणे अपेक्षित आहे, मात्र विकासाच्या नावाखाली केवळ लोकांना त्रासदायक ठरणारे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी भावना येथील रहिवाशांची आहे. सरकारने जनभावना लक्षात घेऊन विकास करावा. पण पूर्वीचा आमचा गावच आम्हाला प्यारा वाटतो. वास्को शहराला ते गावपण लाभावं, हीच श्री देव दामोदराच्या चरणी प्रार्थना.

अनंत मांजरेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com