Goa Monsson: धुक्याचे लँडस्केप, ओसंडून वाहणारे धबधबे! पावसाच्या थेंबांनी जिवंत होणारा, 'हिरवागार स्वर्ग' झालेला गोवा

Goa Monsson Tourism: गोव्यात मान्सून एक अनोखा आणि मोहक अनुभव देतो. किनारपट्टीवरील झगमटापासून दूर, गोव्यातील स्वर्गाची जी लपलेली बाजू आहे जी पावसाळ्यात खरोखरच जिवंत होते.
Goa Rain Tourism
Goa Weather TourismDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कुलकर्णी

गोव्यात मान्सून एक अनोखा आणि मोहक अनुभव देतो. किनारपट्टीवरील झगमटापासून दूर, गोव्यातील स्वर्गाची जी लपलेली बाजू आहे जी पावसाळ्यात खरोखरच जिवंत होते.पाऊस येताच गोवा एका हिरव्यागार स्वर्गात रूपांतरित होतो. धुक्याचे लँडस्केप, ओसंडून वाहणारे धबधबे- हा असा काळ आहे जेव्हा निसर्ग केंद्रस्थानी येतो आणि गोवा आपले शांत सौंदर्य स्वतःच प्रकट करतो.  

भयानक वेगाने होणारे शहरीकरण, आधुनिकतेकडे वाटचाल करणारी गावे असूनही गोव्यातील काही शहरांनी, भागानी आपले जुनेपण टिकवून ठेवलेले आहे. अशा जुन्या भागातून हेरिटेज वॉक, निसर्ग ट्रेल्स करण्यासाठी आणि पाककृतींचा आस्वाद करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे.

मान्सून गोव्याच्या वारसा स्थळांमध्ये आणि गावांमध्ये एक नवीनच आकर्षण निर्माण करतो, एरवी उजाड उष्ण आणि नकोसे वाटणारे रस्ते चिंब ओले झालेले असतात आणि कडेला हिरवे रुजून आलेले असते. पणजीमधील फोन्तेन्हास, ओल्ड गोवा किंवा चांदोर सारख्या ठिकाणांमधून केलेला हेरिटेज वॉक पोर्तुगीज काळातील रंगीबेरंगी घरे, भव्य जुन्या चर्चेस, सुंदर चॅपल आणि दंतकथांनी भरलेल्या एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात.

दिवाडी बेट, साळगाव आणि चोडण बेट यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी गावांमध्ये फिरायला जाण्यामुळे गोव्याचा ग्रामीण भाग गोव्याच्या प्रचलित सुशेगाद गतीने अनुभवता येतो. हिरव्यागार भातशेतीतून फिरता येते, स्थानिकांना भेटायाला मिळते. तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर गोव्याला पश्चिम घाट लाभलेला आहे. सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, पक्षी, बेडूक, साप, वेगवेगळ्या प्रकारच्या पाली, खेकडे, फुलपाखरे, पतंग यांची इथे रेलचेल आहे. पावसाळ्यात, सरीसृप अभ्यासक आणि संशोधक गोव्यातील पश्चिम घाटात लपलेले वेगवेगळे सर्प, बेडूक, वेगवेगळ्या प्रकारची अळंबी यांचे छायाचित्रण करण्यासाठी भेट देत असतात.

 गोव्याचा पावसाळी हंगाम स्थानिक परंपरा प्रदर्शित करणाऱ्या आणि लोकांना एकत्र आणणाऱ्या उत्साही सांस्कृतिक उत्सवांनी भरलेला असतो.  उदा. सांजावं उत्सव, बोन्देर उत्सव, या धार्मिक उत्सवात सामूहिक, मिरवणुका आणि सामुदायिक मेजवानींचा समावेश असतो. गोव्याच्या संस्कृतीची आध्यात्मिक बाजू अनुभवण्याचा हा एक अद्भुत मार्ग आहे.

Goa Rain Tourism
Monsoon Fishing: ढगाळ वातावरण, उधाण आलेले पाणी; मान्सूनमधील गोमंतकीयांची 'नुस्तेमारी'

पावसाळ्यात जंगल भ्रमण आणि धबधबा भेटींचे नियोजन करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज मात्र नेहमी तपासा. कधीकधी, पाऊस मुसळधार असू शकतो. भूस्खलन किंवा तुडुंब पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात ट्रेकिंग टाळा. भूप्रदेशाची माहिती असलेल्या आणि तुमची सुरक्षितता सुनिश्चित करू शकणाऱ्या तज्ञांकडून मार्गदर्शन केलेले अनुभव घेणे चांगले. त्यांची तज्ज्ञता तुम्हाला सुरक्षितपणे लँडस्केपमध्ये भ्रमंती करण्यास आणि तुमचा एकूण अनुभव वाढविण्यास मदत करू शकते.

Goa Rain Tourism
Goa Tourism: मान्सूनमध्ये अनुभवा गोव्याचे जादुई सौंदर्य! पर्यटन विभागाची ‘ग्लो ऑन अरायव्हल’ मोहीम; 4 महिने वेगवेगळ्या थीम्स

तुम्ही निसर्गप्रेमी असाल, अन्नप्रेमी असाल किंवा शांतता शोधणारे असाल, पावसाळ्यात गोव्यात काहीतरी खास आहे. पावसाचा आनंद घ्या, हिरवळ एक्सप्लोर करा आणि गोव्याच्या पश्चिम घाटातील अनोखे आकर्षण शोधा. हा एक असा अनुभव आहे जो कायमस्वरूपी आठवणीत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com