Portuguese Coins: गोव्यात 400 वर्षे राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांनी पाडलेली नाणी, हजार ते लाख रुपयांची आर्थिक गुंतवणूक

Portuguese Goa Coins: नाण्यांचा संग्रह करणे, त्यांचा ऐतिहासिक अभ्यास करणे हा अतिशय चांगला छंद आहे. पण थोडा महागडा छंद आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासही हे एक चांगले क्षेत्र आहे.
Old Coins
Portuguese coins in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र सुब्राय नायक

इतिहासाचा पूर्ण अभ्यास करून, जुन्या नाण्यांचे मूल्यांकन करणे याला, नाणेशास्त्र म्हणतात. असा अभ्यास करणाऱ्यांना नाणेतज्ज्ञ किंवा इंग्रजीमध्ये न्यूमिस्मेटिस्ट म्हणतात. सर्वसाधारणपणे यातही तीन प्रकार आहेत. जुन्या नाण्यांचा इतिहासाच्या माध्यमातून अभ्यास करून या क्षेत्रात पी. एच. डी. (पुरातत्त्व विभाग) वगैरे मिळवणे, हा यातील सर्वोच्च मान. नंतर येतात ते नाणे विक्रेते व सर्वांत शेवटी नाणे संग्राहक.

दोन हजार वर्षे ख्रिस्तपूर्व ते आजपर्यंत कोट्यवधी नाणी मुद्रित केली गेली आहेत. यात हस्तमुद्रित व यंत्र मुद्रित अशी दोन प्रकारची नाणी असतात. स्वतंत्र देशाच्या नाण्यांना तेवढी मागणी नाही. पण ज्या वसाहती होत्या, पोर्तुगीज गोवा, ग्रीक भारत, पूर्व आफ्रिका, नेदर्लंडसच-इंडि, व इंग्रज फ्रांस, पोर्तुगाल, नेदरलँड यांच्या वसाहती. त्यांच्या नाण्यांना भरपूर मागणी आहे. याचे कारण ती नाणी आता पाडली जात नाहीत. म्हणून ही नाणी दुर्मीळ होत चालली आहेत. मी स्वतः गेली तीस वर्षे नाणी गोळा करतो. नंतर त्याचा चांगला संग्रह करतो. यासाठी मी पोर्तुगीजकालीन गोवा हे क्षेत्र निवडले आहे. कधी कधी दुसरी नाणी व नोटाही घेतो.

गोव्यात पोर्तुगिजांनी १५१० ते १९६१ या काळात राज्य केले. या गोव्याला पोर्तुगीज, ‘इस्तादो दा इंडिया’ किंवा ‘इंडिया पोर्तुगीजा’ म्हणतात. आता नाण्यावर लिहिलेल्या पोर्तुगीज शब्दांना मराठी शब्द मिळणार नाहीत. म्हणून मी पोर्तुगीज शब्दच वापरणार आहे. इथे मी उलटी करून कमी सुरुवात करणार आहे. १९५८, १९५९, १९६१ या वर्षात इस्कुदो नाणी पाडण्यात आली. ही नाणी कॉपर-निकेल व कॉपरची आहेत. ६ इस्कुदो, ३ इस्कुदो, १ इस्कुदो, ६० सेंतावोस, ३० सेंतावोस, १० सेंतावोस असा बारा नाण्यांचा सुरेख संच बनतो. यातले सर्वांत शेवटचे १० सेंतावास.

१९६१चे हे नाणे दुर्मीळ असून या फक्त चार ग्राम तांब्याच्या नाण्याचा भाव एक हजार रुपये आहे. हा सर्व बारा नाण्यांचा संच ६ ते ८ हजार रुपयात मिळतो. नाणे कोणत्या स्थितीत आहे याचेही काही निकष आहेत. म्हणजे गुड, व्हेरी गुड, फाईन, व्हेरी फाईन, एक्स्ट्रा फाईन, एक्स्ट्रा फाईन+++, ऑलमोस्ट यु.एन.सी., यु.एन.सी. व प्रूफ. या वरून नाण्याची गुणवत्ता ठरते. यु. एन. सी. म्हणजे अनसर्कुलेटेड कंडिशन. यानंतर येतो तो १९४७चा एक रुपिया, १९५२चा एक रुपिया, हाफ रुपिया, १/४ रुपिया. सहा नाण्यांचा संच. यानंतर १९३४-१९३६ या दरम्यान पाडलेले चांदीचे एक रुपिया व हाफ रुपिया.

या नाण्यावर क्रॉसचे निशाण असते. नंतर येतो तो कार्लुस राजाचा संच. याला ग्रीक भाषेत एम. सी. एम १ व एम. सी. एम. ३ म्हणतात. म्हणजे १९०१ व १९०३. यात १/२ टांगा, १/४ टांगा १/८ टांगा, १/१२ टांगा अशी नाणी आहेत. तर याच्या अगोदर १ टांगा १९४७ व १ टांगा १९५२ ही नाणी पाडण्यात आली. याच्यानंतर येतो तो लुडोविकास राजाचा ओयतावो दे टांगा व क्वार्तो दे टांगा १८८१ ते १८८८ हा सात नाण्यांचा संच. यात १८८८चा क्वार्ता दे टांगा हा दुर्मीळ आहे. फक्त ११ ग्राम (तांबे) वजनाच्या नाण्याचा भाव एक्स एफ+++ कंडिशनमध्ये वीस हजार रुपये आहे. याच्यानंतर लुडोविकस राजाची चांदीची नाणी.

ओयतावो दे रुपिया (दोन आणे), क्वार्तो दे रूपिया, हाफ रुपिया - (मेया रुपीया) व उमा (एक) रुपिया हा सहा नाण्यांचा संच. हा संच सर्वांत सुरेख संच आहे. मध्यंतरी कार्लुस उमा रूपिया १९०१ व उमा रुपीया १९०३. ही चांदीची नाणी पाडण्यात आली. या सर्व नाण्यात ही दोन सर्वांत महत्त्वाची नाणी. १९१२चे चांदीचे राणीचे नाणे, उमा रुपीया म्हणून उपलब्ध आहे. यानंतर १८७१ या सालचा सहा नाण्यांचा संच येतो.

पोर्तुगीज सरकारने यंत्रमुद्रित केलेली ही पहिली नाणी. ही सर्व नाणी तांब्याची आहेत. यात ३ रेईस, ५ रेईस, १० रेईश, १५ रेईस (१/४ टांगा), ३० रेईस (१/२ टांगा) व सर्वांत मोठे ६० रेईस (१ टांगा). या सर्व तांब्याच्या सहा नाण्यांंचे एकत्रित वजन ६० ते ८० (तांबे) ग्राम आहे. पण त्याची किंमत कधी कधी एक लाख रुपयांपर्यंत वर जाते. आता १८७१च्या आधीची सर्व नाणी हस्तमुद्रित आहेत. या नाण्यांची नकल होऊ शकते. म्हणून संग्राहकाने सावध असले पाहिजेत.

या सर्व नाण्यांचे, सर्व वर्णन, इथे करणे शक्य नाही, म्हणून संक्षिप्तपणे वर्णन करतो. या नाण्यांत चांदीची आणि सोन्याची शेराफीम आणि शेराफीन नाणी आहेत. यांचे दोहोंचेही उच्चारण पोर्तुगीजमध्ये ‘शेराफीं’ असाच होतो. १८०१ ते १८७० या कालावधीत पाडण्यात आलेली चांदीची नाणी दहा हजार ते वीस हजार रुपये या भावात मिळतात, तर सोन्याची दोन शेराफी चार शेराफी, आठ शेराफी याचा भाव १लाख मे ते अडीच लाख रुपयेपर्यंत, प्रति नाणे एवढा वर जातो.

गोव्यावर चारशे वर्षे राज्य केल्यानंतर पोर्तुगीज सरकारने, राजा कार्लुस व राणी एमेलीया यांचे चित्र असलेली २०० रेईस, (रेश) ५०० रेईस व १००० रेईस हा तीन नाण्यांचा संच मुद्रित केला. हा चांदीच्या नाण्यांचा संच अधिकच सुरेख आहे. या आधी १५१० ते १८७१पर्यंत अनेक तांब्याच्या, चांदीच्या व सोन्याच्या नाण्यांचे उत्पादन करण्यात आले. यात आतीया, ए. पी. टी. टांगा, पार्दाव, रेईस, रुपिया अशा अनेक नाण्यांचा समावेश आहे. यात पेद्रू पाचवा मारीया दुसरी यांचे एक रुपयांचे चांदीचे नाणे प्रसिद्ध आहे. या आधी १५२२चे बाझारुको, दिन्हेरा, लियाल (जुआव तिसरा), एक रियाल (सेबास्तीयांव) एक सोलडो, मानुएल पहिला, एक बस्तीआव अशी असंख्य नाणी त्या त्या वर्षात सर्व राजांच्या नावे मुद्रित करण्यात आली. त्याचे सर्व वर्णन इथे करणे अशक्य आहे.

Old Coins
Goa History: पेरमाडीदेव राजा गोमंतकीयांचा देव कसा?

आता ही सर्व नाणी खरेदी कशी करावी याबद्दल थोडे विश्लेषण. मुंबई इथे कफ परेडला जागतिक व्यापार केंद्रामध्ये एका वर्षाला दोन प्रदर्शने भरवली जातात. या प्रदर्शनामध्ये सर्व देशांची सर्व नाणी, नोटा उपलब्ध असतात. या व्यतिरिक्त नाण्यांचे पॅकिंग, अल्बम नोटांसाठी विशिष्ट आवरण उपलब्ध असते. फक्त इथे नाण्यांचा भाव थोडा जास्त असतो. एक प्रदर्शन एप्रिलमध्ये तर एक चतुर्थीच्या आधी आयोजित करण्यात येते. या व्यतिरिक्त सोनल हॉल पुणे इथेही वर्षाला एकदा प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या व्यतिरिक्त दिल्ली, सुरत, अहमदाबाद, लखनौ, कोलकाता. बेंगळूरू, मैसुर व सर्व देशभर ही छोटी मोठी प्रदर्शने आयोजित केली जातात. गोव्यात कित्येक वर्षांनी ७, ८, ९ मार्च २०२५ या दिवशी कला अकादमी येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

Old Coins
Old Goa History: कदंब, विजयनगर राजवटीत राजधानीचा दर्जा प्राप्त झालेले गोव्यातील शहर कोणते?

नाण्यांचा संग्रह करणे, त्यांचा ऐतिहासिक अभ्यास करणे हा अतिशय चांगला छंद आहे. पण थोडा महागडा छंद आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासही हे एक चांगले क्षेत्र आहे. माझ्या पोर्तुगीजकालीन नाण्यांची छायाचित्रे व व्हिडिओ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संकेतस्थळांनी ‘स्टँडर्ड’ म्हणून घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com