Beach Safety: पावसाळ्यात 'गोव्यात' या! पण.. समुद्रकिनाऱ्यांवरती काळजी घ्या

Goa Monsoon Beaches: पावसाळ्यात किनाऱ्यांवर धोका दर्शवणाऱ्या लाल ध्वजांची योजना केली गेलेली असते, 'नो सेल्फी झोन' ठरलेले असतात, जीवरक्षक या काळात अधिक सावध असतात.
Drowning Case
Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

व्यक्ती समुद्रात किंवा पाण्यात बुडते त्यामागे अनेकदा त्या व्यक्तीने केलेले नशापान हे मुख्य कारण असते‌ याशिवाय त्यांची सुरक्षिततेच्या बाबतीतली बेफिकिरीही त्यांच्या पाण्यात बुडण्याला कारण होत असते. अनेकदा जीवरक्षकांचा सल्ला धुडकावून लोक पाण्यात उतरतात.

अनेक कारणे ते त्यावेळी देत असतात- मी एक उत्तम पोहणारा आहे, मी सैन्यात आहे अशी असंगत कारणे मी ऐकलेली आहेत. आम्ही दूरवरून समुद्रात पोहण्यासाठी आलेलो आहोत हे कारण तर नेहमीचे आहे. 

पावसाळ्यात समुद्राच्या लाटा 'रीप करंट'मुळे धोकादायक बनलेल्या असतात. त्या पोहोणाऱ्याला वेगाने आत खेचू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात किनाऱ्यांवर धोका दर्शवणाऱ्या लाल ध्वजांची योजना केली गेलेली असते, 'नो सेल्फी झोन' ठरलेले असतात, जीवरक्षक या काळात अधिक सावध असतात. पाण्यात कुणी बुडू नये यासाठी ही योजना असते. अशावेळी सुरक्षा संबंधीच्या सूचनांचे पालन लोकांनी करणे ही आमची स्वाभाविक अपेक्षा असते. 

समुद्राच्या रीप करंटमध्ये सापडल्यावर  चांगली पोहणारी व्यक्तीसुद्धा गोंधळून जाते, भीतीने ती गांगरते आणि लाटांच्या विरुद्ध पोहायला सुरुवात करते. अशावेळी पाण्यासंबंधीचे तिचे अज्ञान तिला दगाफटका करण्यास कारणीभूत ठरते. रीप करंटमध्ये सापडलेल्या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा यासाठी जीव रक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले गेलेले असते.‌

Drowning Case
Goa Drowning Deaths: चिंताजनक! गोव्यात साडेपाच महिन्यांत 51 जणांचा बुडून मृत्यू; सासष्‍टी, धारबांदोडात धोक्याची घंटा

अशा प्रवाहात पोहण्यासाठी ते तयार असतात. मात्र सर्वसामान्य पोहणाऱ्यासाठी रीप करंटमधून स्वतःला कसे वाचवावे याचे ज्ञान नसल्यामुळे तो धोक्यात सापडतो. पावसाळ्यात समुद्राच्या पाण्यात उतरू पाहणाऱ्या लोकांना माझे हेच सांगणे आहे की त्यांच्या इच्छेवर त्यांनी लगाम घालावा.‌ जीवरक्षक जवळपास उभा आहे याची खातरजमा करूनच त्यांनी हवे तर पाण्यात उतरावे. मात्र फार पाण्यात फार खोल न जाता  आपली पावले बुडतील इतपतच पाण्यात जावे.  

Drowning Case
Mandrem Drowning Case: नशेत उतरले नदीत, बोट उलटली; नेपाळच्या व्यक्तीचा बुडून मृत्यू, Watch Video

गोव्यातील बहुतेक लोकप्रिय समुद्रकिनारे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक बनलेले असतात याची लोकांनी नोंद घ्यायला हवी.‌ रीप करंटचा प्रादुर्भाव पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी असतो. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात देखील रिप करंट असतात, परंतु त्यांचा प्रभाव तुलनेने कमी असतो. मात्र पावसाळ्यात गोव्यातील कुठलाच समुद्रकिनारा सुरक्षित नाही हे मी खात्रीने सांगू शकतो.

क्लेटन वाझ

जीवरक्षक कप्तान, दृष्टी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com