Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

Mapusa Market History: पोर्तुगीज शासनाच्या काळात 1960 यावर्षी या बाजाराचे बांधकाम झाले आणि गोवा मुक्तीनंतर, 1962 यावर्षी त्याचे उद्घाटन झाले.‌
Mapusa market
Mapusa marketDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापशाचा बाजार फक्त देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज शासनाच्या काळात 1960 यावर्षी या बाजाराचे बांधकाम झाले आणि गोवा मुक्तीनंतर, 1962 यावर्षी त्याचे उद्घाटन झाले.‌ उत्कृष्ट नियोजन करून बांधण्यात आलेल्या या बाजाराच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना माथ्यावर आपल्याला एक म्युरल दिसते.

(मात्र बाजारात प्रवेश करण्याच्या घाईत आपल्याकडून त्याकडे दुर्लक्षच होत असते. हे म्युरल  तिथे आहे याची कल्पना अनेकांना आजही नसेल.) या म्युरलमध्ये आपल्याला एक बैलगाडी दिसते, ज्यात विविध प्रकारच्या भाज्या विक्रेत्यांनी भरून आणल्या आहेत.‌ त्यातील भोपळा, केळी या भाज्या तर स्पष्ट दिसतात.

यातील भाज्या एक विक्रेती आपल्या बांबूच्या टोपलीत भरून घेत आहे.  त्याशिवाय आपल्या डोक्यावर भाज्या घेऊन त्यात अनेकजण चालताना, तर काहीजण विक्रेत्यांशी बोलून सौदा करताना दिसतात.

त्या काळची वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे त्या सर्वांच्या अंगावर दिसत आहेत.  भाज्यांबरोबरच या बाजारात विकली जाणारी मातीची भांडीसुद्धा या म्युरलमध्ये दिसत आहेत. शुक्रवारच्या बाजाराची सारी वैशिष्ट्ये या म्युरलमध्ये साकारलेली आहेत. एकप्रकारे हे म्युरल 50-60च्या दशकाचा अनुभव करून देणारी सुंदर कलाकृती आहे.

दर शुक्रवारी भरणारा आठवड्याचा बाजार समावून घेणार्‍या या जागेची रचना करताना तिथल्या स्थायी व्यवसायानांही ती पूरक राहील हे पाहिले गेले आहे. गोव्यातच नव्हे तर कदाचित संपूर्ण आशियातील हा अशाप्रकारचा एकमेव नियोजनबद्ध बाजार असेल.

या बाजारात कपड्यांची दुकाने एका जागी आहेत, भुसारी दुकानांसाठी वेगळी जागा आहे, फुलांचा बाजार एका वेगळ्या ठिकाणी आहे, मातीची भांडी विशिष्ट ठिकाणी विकली जात आहेत, माशांचा बाजार वेगळा आहे.

वेगवेगळ्या व्यवसायांना या जागेत वेगवेगळ्या जागा दिल्या गेलेल्या आहेत.  प्रत्येक व्यवसाय इथे फळेल-फुलेल याचे नियोजन करून 65 वर्षांपूर्वी हा बाजार बांधला गेला होता हे लक्षात घेण्याजोगे आहे.

या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे या सार्‍या व्यवसायांचा विचार करून प्रथम साऱ्या इमारती बांधल्या गेल्या व त्यानंतर वेगवेगळ्या व्यवसायांना तिथं जागा पुरवल्या गेल्या. या इमारतीतील प्रत्येक दुकान समान रचनेचे आहे.  

इथल्या आठवड्याच्या बाजारात स्थानिक फळे, फुले, भाज्या, वेगवेगळी धान्ये, वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थानिक मिरच्या, वेगवेगळ्या प्रकारचे पाव, वेगवेगळी गोमंतकीय मिष्ठांन्ने (दोदोल, केक, बिबिंका वगैरे) उपलब्ध असतातच परंतु त्याशिवाय घरगुती औषधेही (किरायते आदी) विक्रीला असतात.‌ मात्र रेडिमेड कपड्यांचा तिथे जो आज विभाग दिसतो तो पूर्वी नव्हता.

तो अलीकडच्या काळातच या मार्केटमध्ये अवतरला आहे. या मार्केटमधील काही व्यवसाय तर हे मार्केट अस्तित्वात घेण्यात पूर्वीच्या काळापासून तिथे आहेत. गोव्यातील हा एक असा बाजार आहे जिथे अजूनही मूळ गोमंतकीय व्यावसायिक आपला व्यवसाय करताना दिसतात.

मुख्य प्रवेशद्वाराच्या आत शिरताच आणखीन दोन म्युरल आपल्याला दिसतील. त्यापैकी एका म्युरलमध्ये माडासंबंधी वेगवेगळे व्यवसाय चितारलेले दिसतात. पूर्वीच्या काळी होडी हे एक प्रवासाचे माध्यम होते.

या होडीतून सामानाची ने-जा होत असे. म्युरलमध्ये आपल्याला ती होडी दिसेल तसेच माळावर चढणारा रेंदेरही आपल्याला दिसेल तर विरुद्ध बाजूला असणाऱ्या म्युरलमध्ये केळीची बाग शिंपताना एक स्त्री दिसते. (म्हापसा शहराला जवळच असलेल्या मयडे गावची केळी प्रसिद्धच आहेत.

Mapusa market
Mapusa Fish Market: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! म्हापसा मासळी मार्केटचे सांडपाणी नाल्यातून थेट नदीत; प्रदूषणात होतेय वाढ

एक प्रवेशद्वारातून बाजारात आत शिरताच आपल्याला समोर दिसणार्‍या एका स्त्रीच्या पुतळ्याच्या चारही बाजूने रुंद रस्त्यांची योजना केलेली आहे. (मात्र आता अनेक किरकोळ विक्रेत्यांनी हे सारे रस्ते अडवून ठेवल्यामुळे ते कुणाच्या लक्षातच येत नाहीत.)

बाजारात काही विपरीत घटना घडल्यास अग्निशमनदलाला तिथे सहज वावरता यावे यासाठी या रुंद रस्त्यांची योजना होती मात्र आताच्या परिस्थितीत ते शक्यच नाही.‌ एक योजनाबद्ध बाजाराला आपण नियोजनशून्य करून टाकले आहे. या बाजाराची उलाढाल प्रचंड असली तरी आता तिथल्या इमारतींकडे पाहता आपल्या व्यवस्थेचा ढिसाळपणाच दुर्दैवाने उघडा पडताना दिसतो. 

Mapusa market
Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

ज्येष्ठ पिढीतील ज्या लोकांनी म्हापशाचा बाजार पूर्वी पाहिला आहे त्यांना आताचा बाजार बदललेला वाटतो. बदल हा हवाच असतो मात्र या बदलामुळे या बाजाराला ज्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे ते गैर आहे असे त्यांना वाटते. पूर्वी या बाजारात स्थानिक शेतातील भाज्या येत असत आता तिथल्या भाज्या कर्नाटकमधून येतात.

स्थानिक फुलांची जागा परगावातील फुलांनी घेतली आहे. या बाजाराच्या बाजूने वाहणारी नदी आक्रसून एक नाला बनली आहे. पावसाळ्यात या बाजारात फुटभर खोल पाणी साचते. एकेकाळच्या, आशियातील उत्कृष्ट मानल्या गेलेल्या या बाजाराचे स्वरूप असे बदलले गेले असले तरी हा बाजार अजूनही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो शक्यतो सांभाळून ठेवला पाहिजे असेही त्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com