मराठा शौर्य विरुद्ध तुर्की घोडे: अप्पाजींनी पावसाळ्यात बहमनी सैन्याला विशाळगडाकडे खेचून दिलेले जोरदार प्रत्युत्तर

Bahmani Vijayanagar conflict: भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण हा भारतीय संस्कृतीचा फार पूर्वीपासूनचा बालेकिल्ला ज्याने पश्चिम घाटाच्या संरक्षणात्मक प्रभावामुळे बाह्य आक्रमणांना तोंड दिले.
Bahmani Vijayanagar conflict
Bahmani Vijayanagar conflict
Published on
Updated on

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण हा भारतीय संस्कृतीचा फार पूर्वीपासूनचा बालेकिल्ला ज्याने पश्चिम घाटाच्या संरक्षणात्मक प्रभावामुळे बाह्य आक्रमणांना तोंड दिले. १३१०मध्ये, इस्लामच्या सैन्याने मोठ्या घोडदळासह कोकणात प्रवेश केला आणि कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला. पराभूत झालेल्या गोव्याच्या कदंबांनी त्यांच्या उर्वरित सैन्यासह एक प्राचीन शहर चंद्रपूर येथे पळ काढला आणि या मजबूत किल्ल्यातून खिल्जी हल्ल्यापासून भूमीचे रक्षण केले.

१३२८मध्ये आक्रमणादरम्यान, दिल्ली शासक मोहम्मद इब्न तुघलकने कोंडाणा किल्ल्यावर व पुण्यावर केलेल्या हल्ल्यानंतर, कोकणात व गोव्यात आक्रमण करण्यावर जोर दिला. घोडेस्वारांसह त्याने गोव्यातील चंद्रपुरावर आक्रमण केले, कदंबांचा पराभव केला आणि शहराचा नाश केला. तथापि, तुघलक इतर लढायांमध्ये गुंतला असताना, कदंबांनी तुघलक सैन्याबरोबर अनेक चकमकींनंतर त्यांचा संपूर्ण नाश करून कोकणचा बराचसा प्रदेश मुक्त केला.

लवकरच दक्षिण भारतात हरिहर आणि बुक्काअंतर्गत मोठ्या प्रमाणात विजयनगर साम्राज्याचे पुनरुज्जीवन सुरू झाले व चंद्रपूर जिंकून घेतले गेले आणि कोकणचा बराचसा भाग विजयनगरच्या नियंत्रणाखाली आणला. कोकणातील माधव मंत्री यांच्या राजवटीत शांतता आणि समृद्धी नांदू लागली.

विजयनगराने केलेल्या सागरी व्यापारामुळे कोकणची भरभराट झाली. विजापूरच्या अरब आणि तुर्क जगाकडून सागरी मार्गाने रसद मिळू नये म्हणून कोकणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे हे विजयनगर सरदारांच्या लक्षात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुर्मीळ असलेले चांगले घोडे, ज्यांनी विजयनगराशी झालेल्या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ते पर्यायाने सागरी मार्गाने मिळू शकत होते. संगमेश्वर आणि विशाळगडच्या सरदारांनी ही सीमा विजयनगरसाठी ठेवली होती.

पुढे ख्वाजामहमद गवान, हा १४५३मध्ये इराकमधील प्रसिद्ध इस्लामिक विद्वान बिदरमध्ये आला. त्यांची इस्लामिक विद्वत्ता आणि शरियतचे ज्ञान भारतातील मुस्लिमांमध्ये अतुलनीय होते आणि लवकरच बहमनी साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मध्यंतरी तुर्कस्तानमध्ये सुलतान महमद दुसरा सत्तेवर आला आणि त्याने त्याचा भाऊ युसूफ आदिल खान याला मारण्याचा प्रयत्न केला जो सिंहासनासाठी लढत होता.

Bahmani Vijayanagar conflict
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

मात्र, युसूफ जहाजातून निसटला आणि बिदरला आला, तिथे महमद गवानने त्याला साहाय्यक म्हणून उचलले. १४६९मध्ये, महमूद गवान बहमनी सैन्यासह, स्वतःच्या अंतर्गत तीन तुकड्यांमध्ये तुर्क, युसूफ आदिल खान आणि कुश खादाम यांनी कोकणात एक भयानक जिहाद सुरू केला.

बहमनीने संपूर्ण भूमीवर जाळपोळ करून असंख्य लोकांना मारल्याने मराठा योद्धा अप्पाजी यांनी बहमनी सैन्याला विशाळगडाच्या अवघड प्रदेशाकडे खेचून पावसाळा येईपर्यंत तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तुर्क पावसाळी परिस्थितीत लढवय्ये नसल्याने, त्यांचे घोडे आर्द्रतेने त्रस्त होते, ते माघारले आणि मराठा सैन्याने त्यांना तलवारीने कापून काढले.

तथापि, महमूद गव्हाण एक दृढ प्रचारक असल्याने त्याला युद्धात मदत करण्यासाठी दोन देशद्रोही बंधू करणसिंग आणि भीम सिंग यांची मदत मिळाली. तुर्क पुन्हा पुढे सरसावले आणि आप्पाजींनी सुसज्ज विशाळगडापासून बचावाची तीच युक्ती वापरून त्यांना रोखण्याचा निर्णय घेतला.

तथापि, करणसिंग आणि भीमसिंग हे घोरपडींचे प्रजनन, प्रशिक्षण करणारे होते जे ते किल्ले चढण्यासाठी वापरत. त्यानुसार करण आणि भीम यांनी वाई प्रांताच्या बदल्यात किल्ला घेण्यास बहमनीना मदत करण्याचे ठरविले. करण आणि भीम यांनी अनेक घोरपडी पाठवल्या आणि त्यांना दोरी बांधून किल्ला ज्या खाडीवर आहे ते मापन केले.

दोरांच्या साहाय्याने ते किल्ल्यावर चढले आणि आणखी माणसे त्यांच्या मागे येण्यासाठी दोरीच्या शिडी उतरवल्या. मग त्यांनी मुख्य किल्ल्याचा दरवाजा उघडला. या प्रक्रियेत करणसिंगला रक्षकांनी ठार मारले, परंतु बहमनी सैन्याने आत प्रवेश करून अप्पाजी आणि त्यांच्या माणसांची हत्या केली. विशाळगड पडल्यानंतर महमूद गव्हाणने समगमेश्वर येथे चालुक्य सैन्यावर हल्ला केला. मोठ्या सैन्याने वेढलेले, चालुक्यांचा बहमनी सैन्याने नायनाट केला आणि त्यांचे संपूर्ण राज्य पूर्णपणे लुटेले गेले.

विजयनगरचा विरूपाक्ष राया त्याच्या अधोगतीच्या वर्षात होता आणि मोठ्या प्रमाणात बहमनीशी लढण्यासाठी पुरेसे सामर्थ्य गोळा करण्यात अयशस्वी ठरला. देशद्रोही कारवायांसाठी, हिंदू भीमसिंग, गव्हाणच्या आदेशानुसार सुलतानने राजा घोरपडे बहादूर (घोरपडीसाठी दख्खनी शब्द) ही पदवी बहाल केली.

Bahmani Vijayanagar conflict
Goa Fire Incidents: एकाच दिवशी सहा ठिकाणी आग, गवत पेटण्याचे प्रमाण वाढले; आगरवाड्यात अनर्थ टळला

त्यामुळे राजा भीमसिंग घोरपडे बहादूर बनले. महमूद गव्हाणने युसूफ आदिल खानच्या नेतृत्वाखाली सुलतान मूद बहमनीसह बंकापूर आणि बेळगावचा नाश करण्यासाठी एक फौज पाठवली. १४७२मध्ये, बेळगावचा किल्ला गव्हाण आणि आदिल खान यांच्या हल्ल्यात आला, ज्याच्या पाठोपाठ झालेल्या लढाईत अप्पाजीचा भाऊ मराठा प्रमुख कनोजी यांनी जोरदार प्रतिकार केला परंतु संख्यात्मक श्रेष्ठ बहमनी सैन्याला रोखण्याच्या प्रयत्नात त्यांचा नाश झाला.

काही वर्षांत, बिदरमधील बहमनीमधील रक्तरंजित सत्तासंघर्षाचा परिणाम म्हणून १४८१मध्ये महमूद गव्हाणचा त्याच्याच साथीदारांनी शिरच्छेद केला. याचा फायदा घेत विरुपाक्षरायाने आपल्या शेवटच्या वर्षांत गोव्यामार्गे कोकण मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण बेळगाव येथे तुर्क, युसूफ आदिल खान यांच्या नेतृत्वाखाली बहमनी सैन्य पटकन पुन्हा एकत्र आले आणि १४८२च्या उत्तरार्धात घोडेस्वारांसह गोव्यावर आक्रमण करण्यास निघाले.

त्याला देशद्रोही भीमसिंग घोरपडे सामील झाले, जो किफायतशीर लुटीच्या शोधात होता. सुरुवातीला विजयनगरच्या सैन्याचा वरचष्मा दिसत होता. पण आदिल खानने विजयनगरच्या सैन्यातील प्रमुख नेत्यांचा नाश करण्यासाठी विश्वासघातकी घोरपडे यांना पाठवले. त्यामुळे हिंदू बुचकळ्यात पडले आणि आदिलखानाने त्यांना कापून काढले. युसूफ आदिल खानने कुश खादाम याला गोव्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले आणि नंतर तो विजापूरचा स्वतंत्र सुलतान बनला.

- सर्वेश बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com