Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

Hydroponic farming technique: हायड्रोपोनिक्स हे एका विशिष्ट गार्डनिंग तंत्राचे नाव आहे. यात पोषक घटकांचा वापर करून पाण्यावर रोपटी वाढवल्या जातात. पाण्यात असलेले हे पोषक घटक रोपे शोषून घेतात.
Hydroponic farming technique
Hydroponic farming techniqueDainik Gomantak
Published on
Updated on

हायड्रोपोनिक्स हे एका विशिष्ट गार्डनिंग तंत्राचे नाव आहे. यात पोषक घटकांचा वापर करून पाण्यावर रोपटी वाढवल्या जातात. पाण्यात असलेले हे पोषक घटक रोपे शोषून घेतात. हायड्रोपोनिक्समध्ये एक वेगळी शाखा आहे जी अॅक्वा कल्चर या नावाने ओळखली जाते ज्यात माशांचे खत पोषक घटक म्हणून वनस्पती वाढीसाठी उपयोगात आणले जाते. 

जेव्हा जमिनीवर वनस्पती उगवल्या जातात तेव्हा त्यांचा स्पर्श मातीला होतच असतो. जरी तुम्ही आपल्या शेतात सेंद्रिय खते वापरली तरी शेजारच्या जमिनीत पीक घेणारा शेतकरी जर आपल्या शेतात रासायनिक खते वापरत असेल तर तो आपल्या जमिनीत वापरत असलेले घातक रसायन जमिनीतून प्रवास करत तुमच्या शेतात पोहोचतच असेल. आमची माती इतकी प्रदूषित झाली आहे की प्रदूषणविहीन जमिनीत आपण शेती करत आहोत असे म्हणणे आज धारिष्टयाचे आहे.

मात्र जेव्हा वनस्पती मातीपासून दूर असतात तेव्हा आपोआपच त्या रसायनिक खतांपासून सुरक्षित असतात. हायड्रोस्पोनिक तंत्रात आपण मातीरहित जागी पीक घेतो. पिकाला रासायनिक प्रदूषणापासून दूर  ठेवणारे हे तंत्र आहे. या प्रकारच्या शेतीला शहरी शेती (अर्बन फार्मिंग) असेही म्हटले जाते कारण या प्रकारची शेती आपण घराच्या गच्चीवर, बाल्कनीत, एका छोट्या जागेतही घेऊ शकतो. अशा प्रकारच्या शेतीतून लोक मुबलक नफा कमवत आहेत हे आपल्याला ऐकून ठाऊक असेल. ही शेती बहुस्तरीय उभ्या रचनेत (vertical) देखील होऊ शकते. पारंपारिक शेतीत जिथे एकच रोपटे लावता येते तिथे अशा रचनेमुळे एकावर एक अनेक रोपटी लावता येतात. 

पारंपारिक शेती आज अत्यंत महागडी होत चालली आहे. मजुरीचा खर्च खूप वाढला आहे. त्याशिवाय आजची शिक्षित पिढी शेतात काम करायला उत्सुक नसते. मात्र हायड्रोस्पोनिक शेतीत कॉलेज विद्यार्थी देखील रस दाखवतात. आमच्याकडे अनेक विद्यार्थी इंटर्नशिपससाठी विचारणा करत असतात. एक छोटे कुटुंब घराच्या बाल्कनीत देखील हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून पुरेसे अन्न मिळवू शकते.

Hydroponic farming technique
Goa Agriculture: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भातशेतीसाठी 40 हजार नुकसान भरपाई; मिरची उत्पादकांनाही मिळणार मदत

यात आपले अन्न स्वतः तयार करण्याचा आनंद आहेच आणि जर व्यावसायिकरित्या जर कोणी अशी शेती करू पाहत असेल तर त्यासाठी किमान 500 चौरस मीटर जागेची किमान आवश्यकता असते. हायड्रोस्पोनिक शेती कुठल्याही बाह्य वातावरणात होऊ शकते कारण कृत्रिम प्रकारे तुम्ही आतील वातावरण नियंत्रित करत असता.

Hydroponic farming technique
Agricultural Drone: गोव्यात शेतीसाठी वापरले जाणार ‘कृषी ड्रोन’! योजनेतून 10 ड्रोन मिळणार; CM सावंताची घोषणा

गोव्यात 'फर्स्ट हाऊस' या फार्मने अशा प्रकारची शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्यामुळे ज्यांना शेती उत्पादनात रस आहे त्यांनी हायड्रोपोनिक्स तंत्र अवश्य अंगिकारावे. आमच्याकडे हायड्रोपोनिक्स तंत्राचे मार्गदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रांमधील मंडळी येतात.‌ त्यात उत्कृष्ट शेफ आहेत, कृषी विद्यार्थी आहेत, गृहिणीही आहेत.

- अभिजीत सावंत (सॅटॅलाइट फार्म, हणजुणे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com