Manish Jadhav
गोवा पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. सोने, चांदी, मोती आणि इतर मौल्यवान खडे येथूनच युरोपात जात. याशिवाय, चोरवाटेने भारतातही या मौल्यवान धातूचे स्मगलिंग व्हायचे.
गोव्यात गुरे चरण्याच्या निमित्ताने सरहद्दीजवळच्या परिसरात सर्सापणे सोन्याची तस्करी व्हायची. मात्र शासनकर्ते पोर्तुगीज याकडे कानाडोळा करायचे. स्वस्त दरात खरेदी करुन चढ्या भावाने विक्री करायचे. अशाप्रकारे गोमंतकीय श्रीमंत झाले.
पोर्तुगीज राजवटीत कायदा व्यवस्था चोख होती. त्यामुळे राज्यात चोरीमारीचे भय नव्हते. लहान-लहान मुलेही मौल्यवान दागिने घालून फिरत. स्त्रियाही सहजपणे सोन्याचे दागिने घावून मिरवत असत.
पोर्तुगीज कायद्याप्रमाणे हिंदू स्त्रियांना लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीवरील हक्क सोडावे लागे. त्यामुळे लग्नाच्या वेळीच तिच्या वाटणीइतके सोने स्त्रीधन म्हणून देण्याची प्रथा सुरु झाली. त्याकाळी सोन्याचे दागिने बाहेर कुठे घालून जाणे देखील जिकरीचे होते.
या प्रथेच्या नावाखाली लोक दरवर्षी मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करु लागले. त्यामुळे सोन्याचे दर कमालीचे वाढले.
मात्र असे असूनही गोव्यातील महिला 'Bold To Wear Gold' मानल्या पाहिजेत. गोव्यातील महिलांचा सोन्याची दागिने घालण्याचा सोस वाढतच गेला. त्या निरनिराळ्या प्रकारचे दागिने परिधान करायच्या.
गोव्यातील सोनार आणि त्यांची कला जगभर वाखानली जायची. येथील दागिन्यांना अरबी आणि आखाती देशातील भरपूर मागणी होती.