Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Panjim Streets: हातात पैसे आणि डोक्यावर छप्पर नसताना देखील दोन वयस्कर महिला नशीब आपल्या हातात नसलं तरीही खुश राहणं नक्कीच आपल्याला जमण्यासारखं आहे हे शिकवून गेल्या....
Panjim Streets: हातात पैसे आणि डोक्यावर छप्पर नसताना देखील दोन वयस्कर महिला नशीब आपल्या हातात नसलं तरीही खुश राहणं नक्कीच आपल्याला जमण्यासारखं आहे हे शिकवून गेल्या....
Goa OpinionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आपण नेहमीच या ना त्या कारणावरून आयुष्याला नावं ठेवतो. हेच ठीक नाहीये, कदाचित हे असं झालंच नसतं. देव आपल्या सोबत नेहमी काही तरी वाईट करतो, इतरांना मात्र भरभरून सुख देतो. कदाचित २४ तासांमधले ८ तास जर का आपण झोपत असू तर राहिलेल्या किमानवेळा आपण फक्त नशिबाला नावं ठेवत असतो. गोव्यातलं पणजी शहर नेहमी गजबजलेलं असतं, पण याच शहराच्या रस्त्यावर आयुष्याचा खरा अर्थ सापडला. हातात पैसे आणि डोक्यावर छप्पर नसताना देखील दोन वयस्कर महिला नशीब आपल्या हातात नसलं तरीही खुश राहणं नक्कीच आपल्याला जमण्यासारखं आहे हे शिकवून गेल्या.

पणजीत बेबी नावाची एक वयस्कर महिला राहायची, सकाळ ते संध्याकाळ ती घरात धुणीभांडी करायची. तिला ना स्वतःचं घर होतं ना आपलं म्हणावं असं कुणी माणूस. तरीही रोज हसत जगायची, समोरच्या माणसाशी हसून बोलायची. बेबीच्या चेहऱ्यावर कायमच हसू असायचं. वय वाढत गेलं तसं बेबीला चालत येईना, घरच्या एका कोपऱ्यात राहिलेलं सगळं आयुष्य काढायची वेळ आली होती ती देखील एकटीनेच, पण बेबी तरीही नशिबाला नावं ठेवत नव्हती किंवा तिचं हसू सुद्धा कमी झालं नव्हतं. शेवटच्या काही दिवसांत सुद्धा बेबी इतरांचा विचार करायची.

बेबी प्रमाणेच पणजीत सांतन नावाची एक वृद्ध महिला राहायची. तिच्याजवळ ना हक्काचं घर ना हाक मारायला कोणी जवळचं माणूस, तरीही सांतन कायम हसतमुख होती. कदाचित सांतनच्या स्वभावामुळे कोणीही नसताना देखील ती कधी उपाशी राहिली नाही.

Panjim Streets: हातात पैसे आणि डोक्यावर छप्पर नसताना देखील दोन वयस्कर महिला नशीब आपल्या हातात नसलं तरीही खुश राहणं नक्कीच आपल्याला जमण्यासारखं आहे हे शिकवून गेल्या....
Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

कधीतरी तिच्याजवळ झोपायला सुद्धा एक ठराविक जागा नसायची, तरीही सांतन खुश होती. देवाला स्वतःचा मित्र मानायची. स्वतःजवळ असलेले पैसे किंवा जेवण इतरांना देताना एकदाही तिच्या मनात मी हे दुसऱ्याला दिलं तर स्वतः उपाशी राहीन असा प्रश्न तिच्या मनात आला नसावा.

बेबी काही दिवसांपूर्वीच वारली, सांतन सुद्धा आता तिच्या रोजच्या ठिकाणी दिसत नाही. या दोघींकडे असं काय होतं जे आपल्याकडे नाहीये, किंवा काहीही नसून सुद्धा त्या सुखी कशा? कदाचित त्यांनी परिस्थिती स्वीकारली असेल, कदाचित त्या समाधानी असतील म्हणून. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा कदाचित आपल्याडे काय आहे याचा विचार केला तर आपण देखील आनंदी होऊ!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com