Christmas In Goa: गोव्यात पूर्वी 'ख्रिसमस'चे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी गाव एकत्र येत असे, कडाक्याच्या थंडीतील परिचित उब

Goa Christmas homecoming: आपल्या माणसांना पुन्हा सुरक्षिततेची आणि जुळण्याची हमी देणारी ती कृती असते. अर्थात एकेकाळची गोमंतकीय जीवनशैली आता हळूहळू विरत चालली असल्याचेही जाणवते आहे.
Traditional Christmas celebrations in Goa
Traditional Christmas celebrations in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goan Christmas Traditions: दिवस कडाक्याच्या थंडीचे आहेत मात्र गोव्यातील काही घरे या दिवसात एक परिचित उब मिळून प्रफुल्लित होतात, कारण बाहेरगावी गेलेले अनेक जण या दिवसात आपली घरी परतून आलेले असतात. नोकऱ्यांमध्ये अडकलेल्यांना, चांगल्या आयुष्याच्या शोधार्थ दूरदेशी गेलेल्यांना ख्रिसमसच्या काळात पुन्हा आपल्या घरी येऊन ख्रिसमस ट्री सजवायची असोशी लागलेली असतो.

जे परदेशातून परततात ते पुन्हा गोव्यातील छोट्या छोट्या अनुभवांना आनंदाने सामोरे जातात. पदेराला नेहमीपेक्षा चार पाव जास्त पुरवायला सांगितले जाते, मासळी बाजारात ताज्या इसवणाचा शोध घेतला जातो. मित्रांना भेटण्याचा आणि लहानपणी चाखलेल्या अन्नाचा आस्वाद पुन्हा घेण्याचा प्रयत्न होतो. कटलेट ब्रेड, चोरीस-पाव हे शब्द चवीने पुन्हा पुन्हा ओठांवर आळवले जातात.

परदेशी स्थायिक झालेले गोमंतकीय ख्रिश्चन बांधव परदेशातील आपल्या घरी देखील ख्रिसमस ट्री सजवत असले किंवा तिथेही मिष्ठान्ने तयार करत असले तरी प्रत्यक्ष गोव्यात ख्रिसमस साजरा करतानाचा आनंद हा वेगळाच असतो.‌ गोव्यात परतणे हे आपलेपणाची भावना असलेल्या प्रदेशात पुन्हा पाऊल टाकण्यासारखे असते.

Traditional Christmas celebrations in Goa
Oldest Christmas Tree: 1441 मध्ये उभारलेला युरोपातील पहिला 'ख्रिसमस ट्री', एस्टोनियाची राजधानी, टॅलिनमधील खास नाताळ

आपल्या माणसांना पुन्हा सुरक्षिततेची आणि जुळण्याची हमी देणारी ती कृती असते. अर्थात एकेकाळची गोमंतकीय जीवनशैली आता हळूहळू विरत चालली असल्याचेही जाणवते आहे. ख्रिसमसचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी पूर्वी संपूर्ण गाव एकत्र येत असे. त्याकाळी कुटुंबाकडे स्वतःचे 'ओव्हन' नसायचे. मागच्या दारी असलेल्या लाकडांच्या विस्तवावर पदार्थ तयार होत असतात. गॉसिप आणि हसणे-खिदळणे यांचीही ऊर्जा असायची.

Traditional Christmas celebrations in Goa
Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

कुटुंबातील एखाद्याच्या जाण्याने जे घर दुःखी असायचे त्या घरी वाड्यावरील इतर घरांमधून ख्रिसमसचे जिन्नस पोचायचे. ख्रिसमसच्या दिवसात ज्यांना परदेशातून आपल्या घरी पोहोचणे शक्य नसते ते जिथे आहेत तिथे नक्कीच आपल्या आठवणीतील ख्रिसमसला आपल्या हृदयाशी कवटाळून बसत असतील. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांच्या लाटांचा नाद त्यांच्या त्या आठवणींना साथही करत असेल. ‘घरी परतणे’ यासारखे सुख त्यात नसले तरी त्या दिवसात त्यांच्या हृदयात उमटणारे त्यांचे मूळ घर त्यांना थोडा दिलासाही देत असेल यात शंका नाही.

अॅबिगेल क्रेस्टो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com