
जग तंत्रज्ञानचलित आणि त्यामुळे वेगवानही बनले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. स्मार्टफोन पासून लॅपटॉप अशा गॅझेट्सवर आपण आज अपरिहार्यपणे विसंबून आहोत. मात्र या नावीन्यपूर्ण वेगामुळे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची (ई कचरा) समस्या राक्षस म्हणून आमच्या समोर उभी ठाकली आहे. ई कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास पर्यावरण आणि मानवी आरोग्य या दोन्हींना मोठा धोका असेल हे नक्की.
आणि त्यामुळेच ‘कचरा वर्गीकरण’ आज महत्त्वपूर्ण बनले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे शिसे, पारा आणि कॅडमियम यासारखे घातक पदार्थ माती आणि पाण्यात मिसळू शकतात.
ई-कचरा वेगळा करून आम्ही हे निश्चित करू शकतो की ही उपकरणे योग्य प्रकारे रिसायकल केली गेली आहेत आणि त्यांची पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदाररीत्या विल्हेवाट लावली गेली आहे.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ई कचऱ्याच्या पुनर्वापरामुळे मौल्यवान संसाधनांचे रक्षण तर होतेच शिवाय नवीन उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल, ऊर्जा आणि पाण्याचीही बचत होते.
कचऱ्याचे विलगीकरण व्यक्ती तसेच समाजाच्या कचऱ्याच्या योग्य विल्हेवाट लावण्याच्या सवयींना प्रोत्साहन देते. अशा प्रकारच्या कृतीमुळे लोक पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागृत होऊ शकतात आणि टिकाऊपणाची संस्कृती वाढू शकते.
अर्थात कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार, व्यावसायिक आणि समाज यामध्ये ताळमेळ आणि सहकार्य आवश्यक आहे. घरातील इतर कचऱ्यापासून ई-कचरा वेगळा करून आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते आहे याची खात्री करून घेणारी व्यक्ती या कामात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते तसेच उद्योजक ‘वस्तू परत करा’ तत्वे राबवून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेऊ शकतात.
सारांश हा आहे की ई-कचऱ्याला सामान्य कचऱ्यापासून विलग करून आणि त्याचा योग्य पुनर्वापर किंवा योग्यरीत्या विल्हेवाट लावून आम्ही संसाधनांचे संरक्षण करू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो तसेच टिकाऊपणाचा प्रसार करू शकतो. अशा प्रकारच्या आपल्या कृतींद्वारे भावी पिढ्यांसाठी हा ग्रह स्वच्छ व निरोगी राहील या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
- इन्फ्रो ई-वेव्ह, ई-वेस्ट सोल्युशन, साळगांव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.