Goa E-Waste: गोव्यात 13 ऑक्टोबरपासून ई-कचरा संकलन मोहीम

पर्यावरण मंत्री निलेश काब्राल करणार उद्घाटन; दोन्ही जिल्ह्यांमध्ये संकलन केंद्रे
Goa E-Waste Collection
Goa E-Waste CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa E-waste: गोव्यात ई-कचऱ्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी ई-कचरा संकलन मोहिम राबवली जाणार आहे. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल 13 ऑक्टोबर रोजी ई-कचरा जनजागृती कम संकलन मोहिमेचे उद्घाटन करतील.

ही मोहीम लायन्स इंटरनॅशनलद्वारे आयोजित करण्यात येणारी जगातील सर्वात मोठी कचरा जनजागृती आणि संकलन मोहीम आहे. लायन्स इंटरनॅशनलचे या मोहिमेचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी या मोहिमेत गोव्यातून 11 टनांपेक्षा जास्त ई-कचरा गोळा करण्यात आला होता.

तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभाग असेल. महिनाभर चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमाद्वारे ई-कचरा संकलन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

Goa E-Waste Collection
Sudin Dhawalikar: रिलायन्सकडून 200 कोटी जमा; 2024 नंतर वीज समस्या भेडसावणार नाही...

देशात २०२१-२२ मध्ये ३.२ दशलक्ष टनांहून अधिक ई-कचरा निर्माण झाला होता. ई-कचरा निर्माण करणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. 2050 पर्यंत देशात 163 दशलक्ष टन ई-कचरा तयार होण्याची शक्यता आहे.

हे चिंताजनक आहे आणि त्यामुळेच हा सरकारच्या अजेंड्यावरील विषय आहे. दरम्यान, राज्य सरकारनेही ई-कचऱ्याचा प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतला आहे आणि लायन्सला सरकारकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.

ई-कचऱ्याची व्यावसायिक पद्धतीने हाताळणी करणे आवश्यक आहे आणि ज्या वस्तूंचे नूतनीकरण केले जाऊ शकते ते केले जाईल. समाजातील गरजू घटकांना दिले. दोन महिने चाललेल्या या मोहिमेची 15 डिसेंबरला सांगता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com