Curti Khandepar: फोंडा मतदारसंघाचा 50% भाग व्यापणारी 'कुर्टी - खांडेपार' पंचायत! झेडपी आरक्षण; आशा, निराशा व समीकरणे

Curti Khandepar ZP Election: झेडपी फोंडा मतदारसंघाचा ५० टक्के भाग व्यापत असल्यामुळे या झेडपीच्या निवडणुकीवर राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष असते.
Curti Khandepar
Curti KhandeparDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

कुर्टी झेडपी ही फोंडा मतदारसंघातील एकमेव झेडपी. या झेडपीत संपूर्ण कुर्टी - खांडेपार पंचायत येते. त्यामुळे ही झेडपी फोंडा मतदारसंघाचा ५० टक्के भाग व्यापत असल्यामुळे या झेडपीच्या निवडणुकीवर राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष असते.

त्यात परत आता लवकरच फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्यामुळे ही निवडणूक म्हणजे आगामी पोटनिवडणुकीची ‘सेमी फायनल’ असे मानले जात आहे. पण यावेळी कुर्टी झेडपी मतदारसंघ अनुसूचित जातींकरता आरक्षित केल्यामुळे आता या निवडणुकीवर मर्यादा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मगो पक्षाच्या प्रिया च्यारी या कुर्टीच्या विद्यमान झेडपी. पण आता या आरक्षणामुळे त्या यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे गेले काही दिवस निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशांवरही पाणी पडले आहे.

त्याचाच परिणाम म्हणून नवीन समीकरणे उदयाला आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आता उमेदवारांच्या निवडीवर मर्यादा येणार आहेत, त्यामुळे मतदारांनी दिलेला कौल किती निरपेक्ष असेल हे सांगणे कठीण आहे.

मात्र फोंड्याची पोटनिवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप आपली पूर्ण ताकद पणास लावणार आहे यात शंकाच नाही. त्यात परत मगोची साथ मिळणार असल्यामुळे भाजप बाजी मारू शकतो अशी सध्या परिस्थिती आहे.

मात्र उमेदवार कोण यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवि नाईक यांचे निधन झाल्यामुळे उमेदवार निवडण्याची जबाबदारी फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी व फोंडा भाजपचे गटाध्यक्ष हरेष नाईक यांच्यावर असण्याची शक्यता आहे.

त्यात परत दळवी हे भाजपचे जुने कार्यकर्ते, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याला जास्त महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.

या आरक्षणाचा भाजपप्रमाणेच कॉंग्रेसवरही परिणाम होणार आहे. कुर्टी-खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच जॉन परेरा व स्थानिक कार्यकर्ते प्रवीण बोंद्रे यांचे नाव कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात होते. पण आता या आरक्षणामुळे हे दोन्हीही उमेदवार रिंगणाच्या बाहेर पडले आहेत.

त्यामुळे आता कॉंग्रेसला नव्याने तयारी करावी लागेल. फोंड्याची पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसला योग्य उमेदवार निवडावा लागेल. या जिल्हापरिषदेअंतर्गत प्रियोळ मतदारसंघातील वेरे-वाघुर्मे ही पंचायतसुद्धा येत असली तरी तिथे सध्या सामसूम दिसत आहे.

Curti Khandepar
Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

त्यामुळे उमेदवार कुर्टी-खांडेपार पंचायतीतला असण्याची अधिक शक्यता आहे. त्यात परत प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांची भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही.

कुर्टी झेडपी अनुसूचित जातींकरता आरक्षित करण्यामागे राजकारण असल्याची चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ इतर मागासवर्गीय महिलांकरता राखीव होता. त्यामुळे आता सलग दुसऱ्या खेपेस हा मतदारसंघ आरक्षित करण्यात आला आहे. विद्यमान झेडपी प्रिया च्यारी या मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या निकटवर्तीय म्हणून गणल्या जात असल्यामुळे हा अप्रत्यक्षपणे भाटीकराना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Curti Khandepar
Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

मागच्यावेळी त्यांना निवडून आणण्यात भाटीकरांचा सिंहाचा वाटा होता. अर्थात त्यावेळी मगो भाजप वेगळे होते, हेही खरे. त्यामुळे आता भाटीकरांची भूमिका काय असणार यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. ते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतात की स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवितात हे बघावे लागेल. मात्र या भूमिकेवरच त्यांची फोंडा पोटनिवडणुकीतील भूमिका स्पष्ट होणार आहे एवढे मात्र निश्चित.

फोंडा मतदारसंघात आणखी काही दिवसानंतर पोटनिवडणूक होणार असल्यामुळे इथे या झेडपी इथे १३ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीची चक्रे आतापासूनच होणाऱ्या फिरायला सुरुवात झाली आहे. आता यात कुणाच्या हाती काय लागते हे येत्या आठ-दहा दिवसांतच कळून येईल एवढे निश्चित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com