
अलेक्झॅंडर बार्बोझा
हवामानातील उष्णता वाढतच चालली आहे. अलीकडच्या काही वर्षात नोव्हेंबरच्या भर मध्यातही थंडी पूर्वीसारखी जाणवणारी नसते. अर्थात गोवा हे एकमेव ठिकाण नाही जे हे अनुभवत आहे. उष्णता वाढत असल्याच्या बातम्या सारीकडून येत आहेत. हवामान बदल हे वास्तव आहे. बाकु येथील शिखर परिषदेत यासंबंधी अशी एकवाक्यता झाली आहे की कमी उत्पन्न असलेल्या देशांना हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची आवश्यकता असेल.
यावर सोपा उपाय नाहीच आहे का? माझ्यासारख्या एक सामान्य व्यक्तीने तसा एखादा उपाय सुचवणे कठीण आहे पण दक्षिण अमेरिकेतून आलेल्या एका उदाहरणाने एक दिलासा मात्र दिला आहे. कोलंबियातील मेडेलीन या शहराने असे काहीतरी केले आहे ज्यातून आपण शिकू शकतो.
असंख्य झाडे लावल्याने या शहराच्या तापमानात म्हणे सकारात्मक बदल झाला आहे. या शहरात निर्माण केल्या गेलेल्या हरित कॉरिडोरमुळे तेथील तापमान सुमारे २ अंश सेल्सिअस खाली आले आहे. हे हरित कॉरिडॉर म्हणजे शहरातील हिरव्यागार जागा झाडे आणि सावलीने वेढलेल्या रस्त्यांद्वारे जोडण्याचा एक प्रयत्न होता.
संपूर्ण शहरात २.५ दशलक्ष लहान रोपे आणि ८ लाख ८० हजार झाडे त्यासाठी लावली गेली. ते खर्चीक होते ,परंतु त्याचे परिणाम अतिशय चांगले मिळाले. या प्रकल्पाला परिवर्तनीय हवामान उपायांसाठी अॅशडेन पुरस्कारही लाभला.
गोव्यात मात्र सध्या मेडेलीनमध्ये जे झाले त्याच्या उलट घडत आहे. आलिशान प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी इथे झाडे तोडली जात आहेत. राज्याच्या राजधानीत सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या कडेला रोपटी लावली जात असल्याचे आपण पाहत आहोत.
हे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आहे की शहरातील झाडांची संख्या वाढवण्यासाठी हे आम्हाला ठाऊक नाही मात्र त्यांच्यामुळे पणजीच्या तापमानात जर फरक पडत असेल तर राज्याच्या इतर भागातही त्याचे अनुकरण करता येईल काय?
अर्थात पणजीत लावलेली ही रोपे योग्यरीत्या वाढण्यासाठी त्यांना नियमित पाणी द्यावे लागणार आहेत ही गोष्ट आपण विसरता कामा नये. जर ही सुरुवात असेल तर ती अधिक विकसित होण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागणार आहेत आणि अधिकाधिक रोपे लावली जाताना विद्यमान झाडे तोडली जाणार नाहीत याची खात्रीही करून घेणे गरजेचे आहे.
मेडेलीन शहराने सोप्या पद्धतीने ते करता येते असे दाखवून दिले आहे. गोवा त्यांचे उदाहरण घेऊ शकेल काय?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.