Children Screen Addiction: मोबाईलच्या हातात गेलेलं बालपण; स्क्रीनच्या अतिरेकाने मुलांचं भावविश्व धोक्यात?

Children Screen Time Problems: पालकांनी स्वतःच्या स्क्रीन वापराकडेही पाहणे गरजेचे आहे. कारण मुलांना आपण जे सांगतो त्यापेक्षा आपण जे करतो, त्याचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो.
Effects of excessive screen time on children
Children screen addiction and excessive mobile phone useAi Image Generator
Published on
Updated on

सुलक्षा गावस

पालकांनी स्वतःच्या स्क्रीन वापराकडेही पाहणे गरजेचे आहे. कारण मुलांना आपण जे सांगतो त्यापेक्षा आपण जे करतो, त्याचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो. ‘मोबाईल कमी वापर’ असे सांगताना पालक स्वतः सतत मोबाईलमध्ये असतील, तर मुलांकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा कशी करणार?

पालकांनी स्वतःच्या स्क्रीन वापराकडेही पाहणे गरजेचे आहे. कारण मुलांना आपण जे सांगतो त्यापेक्षा आपण जे करतो, त्याचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो. ‘मोबाईल कमी वापर’ असे सांगताना पालक स्वतः सतत मोबाईलमध्ये असतील, तर मुलांकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा कशी करणार?

माझ्या ‘प्रोजेक्ट दास – डिजिटल आरोग्य आणि संतुलन’ या उपक्रमांतर्गत हल्ली पणजीतील एका शाळेत पालकांसाठी ‘डिजिटल हायजिन’ या विषयावर कार्यशाळा सुरू आहेत. आपल्या जीवनात स्क्रीनने केलेला शिरकाव आणि त्याचे काळजीकरण्याजोगे दुष्परिणाम रोज शंभर-दीडशे पालकांकडून ऐकायला मिळत आहेत. छोट्या गटचर्चांमधून या समस्येचा अतिरेक कसा रोखता येईल, यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Effects of excessive screen time on children
Goa Women Reservation: गोवा विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्या! अधिवेशनात ठराव मंजूर करा, महिला आघाडीची मागणी

‘मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाहीत.’ एका मुलाचा अभ्यास घेताना दुसऱ्या ‘मुलांला गप्प एका जागी बसवण्यासाठी मोबाईल द्यावा लागतो.’‘मोबईल, टॅब घेऊन जास्तवेळ बसू नका हे मुलांना समजावून सांगून आम्ही थकलो आहोत.ती ऐकत नाहीत (६-१० वयोगटातील मुलं) आता तुम्हीच काहीतरी मदत करा.’ असं अगदी हतबल झाल्यासारखे त्यांना बोलताना पाहून मन अस्वस्थ होते.त्यात काही पालक या विषयावर बोलताना भावुक होतात. त्यावरून ह्या समस्येचे गांभीर्य लक्षात घ्या.

हे सगळे विचार मनात सुरू असतानाच केरळमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल वाचायला मिळाले. तेरा वर्षांच्या एका मुलीने काही मित्रांच्या मदतीने आपल्या आजोबांच्या हत्येचा कट रचल्याचे वृत्त समोर आले. या घटनेशी संबंधित तपासात, घरातील सोनं घेऊन, मुलं पसार झाली त्यामागे मोबाईल, मोटारसायकल मिळवण्याच्या हेतूचाही उल्लेख करण्यात आला. ती हत्या निर्दयीपणे होताना ही मुलगी सगळे व्हिडीओ कॉलवर पहात होती, हे वाचून मन आणखी सुन्न झाले.

आपल्या गरजा भागवताना अगदी नाती गोती यांचा विसर पडून भावना बधिर झाल्यासारखी वागणारी ही किशोरवयीन मुलं घराघरात दिसू लागली आहेत. मोबाईल आणि मुलं ह्याच्या सख्ख्याआड येणाऱ्या कुणाचीही/कशाचीही ती गय करत नाही. हाती मोबाईल किंवा स्क्रीन कायम राहावा, त्याचा मनाजोगता, अमर्याद वापर करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. ते करताना ना त्यांना स्वतःच्या होणाऱ्या नुकसानीचे भान असते, ना आपण इतरांना मनाला जी ठेच पोहोचवत आहोत त्याचे. कालांतराने त्यांचे आत्मभान एवढे हरवते की, ती स्वार्थबुद्धीने विचार करून टोकाची भूमिका घेतात.

Effects of excessive screen time on children
Goa Stray Dogs: 1.5 लाख भटके कुत्रे, 16 लाख लोकसंख्या; गोव्यात सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर

ही घटना केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून वाचून पुढे जाण्यासारखी नाही. मुलांच्या डिजिटल सवयींकडे आणि मानसिक आरोग्याची त्यामुळे होणाऱ्या हानीकडेही आपण किती गांभीर्याने पाहायला हवे. अर्थात, एखाद्या मुलाच्या गंभीर गुन्ह्यामागे केवळ मोबाईल किंवा स्क्रीनला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. अशा घटनांमागे अनेक सामाजिक, कौटुंबिक, मानसिक आणि वैयक्तिक घटक असतात. मात्र स्क्रीनचा अतिरेक, हिंसक किंवा अयोग्य डिजिटल आशय, सततचे गेमिंग, सोशल मीडियाचा प्रभाव आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक असंवेदनशीलता याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

मुलांनी एका जागी बसावे, नीट जेवावे, दंगा करू नये म्हणून त्यांच्या हातात हे ‘बधिर करून एका जागी बसवणारे खेळणे’ सहज दिले जाते. सुरुवातीला त्यात बडबडगीते, गोष्टी, कार्टून असतात. पुढे गेम्स येतात. हळूहळू ही गट्टी अधिक घट्ट होत जाते आणि वेळेची, वापराची मर्यादा कुठे संपली हेच कळत नाही. मुलांना स्क्रीनपासून दूर करण्याचा प्रयत्न केला की रडणे, चिडचिड, हट्ट, आक्रमकपणा किंवा पालकांशी संघर्ष सुरू होतो. काही वेळा पालकही या संघर्षाला कंटाळून पुन्हा मोबाईल त्यांच्या हातात देतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होते.

मोठ्या मुलांमध्ये परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, पहाटेपर्यंत गेम्स किंवा सोशल मीडिया, त्यानंतर सकाळी शाळेत जाण्याची अनिच्छा, अभ्यासाकडे दुर्लक्ष, झोपेचा अभाव आणि सततची चिडचिड या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर, शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर, करियरवर आणि सामाजिक संबंधांवर होताना दिसत आहे. प्रश्न फक्त ‘मुलं मोबाईल किती वेळ वापरतात?’ एवढाच नाही. ते मोबाईलवर काय पाहतात?कोणाशी संवाद साधतात? कोणते गेम खेळतात? कशा प्रकारचा आशय त्यांच्या मनावर ठसा उमटवत आहे? मोबाईलच्या बाहेर त्यांचे भावनिक आणि सामाजिक जग किती समृद्ध आहे? हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

Effects of excessive screen time on children
Goa Illegal Clubs: बेकायदा क्लबवरील कारवाईला सरकारची वेसण; 'एकटा सरपंच, थेट सील' पद्धतीला लगाम

जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांच्या स्क्रीन वापराबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. मात्र त्याबाबत पालकांमध्ये पुरेशी जागरूकता दिसत नाही. समस्येबद्दल कुजबुज आहे, चिंता आहे; पण त्यावर मोकळेपणाने चर्चा करून सामूहिकपणे उपाय शोधण्याचे प्रयत्न अजूनही अपुरे आहेत.काही ठिकाणी दुर्लक्ष, निष्काळजीपणा पालकांमध्ये अजूनही दिसत आहे, ही खंत आहेच. लहान वयातच स्क्रीनचा वापर सवयीचा आणि अनियंत्रित झाला, तर मोठ्या वयात त्यावर मर्यादा घालणे अधिक कठीण होऊन जाते .

पालकांनी स्वतःच्या स्क्रीन वापराकडेही पाहणे गरजेचे आहे. कारण मुलांना आपण जे सांगतो त्यापेक्षा आपण जे करतो, त्याचा त्यांच्यावर अधिक परिणाम होत असतो. ‘मोबाईल कमी वापर’ असे सांगताना पालक स्वतः सतत मोबाईलमध्ये असतील, तर मुलांकडून वेगळ्या वर्तनाची अपेक्षा कशी करणार?डिजिटल साधने आपल्या आयुष्याचा भाग आहेतच पण त्यांचा वापर आपल्या आयुष्यावर राज्य करत तर नाही ना, याची काळजी घेणे म्हणजे डिजिटल आरोग्य आणि संतुलन.

एरवी मी लिखाणातून समस्या मांडून पुढे सकारात्मक विचार पेरण्याचा माझा अट्टाहास असतो. पण यावेळी मनातली खंत आणि काळजी व्यक्त करावीशी वाटली. पालक, शिक्षक, शाळा, समुपदेशक, बालमानसशास्त्रज्ञ आणि मुलांसोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन या विषयावर गंभीरपणे काम करण्याची तीव्रतेने गरज भासू लागली आहे. मुलांच्या मोबाईलच्या पलीकडे एक समृद्ध जग द्यावे लागेल खेळाचे, वाचनाचे, संवादाचे, नात्यांचे, सर्जनशीलतेचे आणि प्रत्यक्ष अनुभवांचे. त्यांना कंटाळाही आला पाहिजे त्याशिवाय ती मन रिझवणारे उद्योग शोधणार नाहीत. त्यांच्याशी बोलायला, ऐकून घ्यायला वेळ काढावा लागेल.

Effects of excessive screen time on children
Influenza Fever Goa: ताप आलाय? भिवपाची गरज ना! गोव्यात इन्फ्लूएंझाचे 73 हून अधिक रुग्ण; 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

तंत्रज्ञान हा आजच्या मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुलांचे मानसिक आरोग्य जपत, तंत्रज्ञानाचा निरोगी व संतुलित वापर खेळीमेळीने रुजवणे, आभासी व वास्तव जीवनातील समतोलाबाबत जागरूकता ‘प्रोजेक्ट दास’ च्या माध्यमातून निर्माण करण्याचा माझा मानस आहे. हा बहुजन सुखाचा आणि हिताचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागावा, हीच सदिच्छा आणि कळकळीची विंनती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com