Brahmin History: पृथ्वीवर साठ वर्षांचा दुष्काळ पडला, सर्व प्राणी नष्ट झाले; काही ब्राह्मणांनी गंगा नदीच्या काठावर स्थलांतर केले

Brahmin Identity: धर्मशास्त्रातील काही उतारे उद्धृत केले आहेत जे अशा परिस्थितीत (आपद्धर्मात) ब्राह्मणांचे वर्तन कसे असावे, हे सांगतात.
Brahmin History
Drought X
Published on
Updated on

तेनसिंग रोद्रीगश

ब्राह्मण’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा वंश या दृष्टीनेच प्रामुख्याने विचार करतो; ‘वर्ण’, ‘कर्म’ किंवा ब्राह्मण या संज्ञेशी परंपरेने जोडलेल्या कुठल्याही गुणधर्माचा नाही. ब्राह्मणाच्या आपल्या कल्पनेत त्यांची वांशिकता केंद्रस्थानी आहे; त्यांचा ’वर्ण’ नाही, त्यांचा ’कर्म’ नाही किंवा त्या संज्ञेशी पारंपारिकपणे जोडलेला कोणताही गुणधर्म नाही. वांशिकतेचा स्पष्टपणे एक भौगोलिक अर्थ आहे.

जेव्हा आपण म्हणतो की एक विशिष्ट गट ब्राह्मण आहे, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्या गटाचा उगम, मध्य आशियातील तृणसंघातातून सुमारे २००० ईसापूर्वच्या दरम्यान भारतीय उपखंडात स्थलांतरित झालेल्या लोकांपासून झाला आहे. हा अनुवांशिक वारसा ब्राह्मणाचे वर्णन, व्याख्या आणि मर्यादा स्पष्ट करतो.

जर एखाद्या गटाच्या सदस्यांमध्ये इतर कोणतेही गुणधर्म असतील जे पारंपरेने त्यांना ब्राह्मण ठरवू शकतील, परंतु ते या वंशाचे नसतील, तर आपण त्यांना ब्राह्मण मानत नाही. म्हणून, जर आपण असे म्हणतो की एखादा गट ब्राह्मण नाही, तर त्याचा अर्थ फक्त असा होतो की त्या गटाचा वंश मध्य आशियाई तृणसंघातातील नाही, भले त्यांच्या इतर कोणत्याही गुणधर्मात साम्य का असेना! कारण, आपल्याला पूर्णपणे वांशिक चौकटीतच त्यांचा विचार करायचा आहे. इतक्या काटेकोरपणे गाळीव चौकटीत जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एक प्रश्न उपस्थित होतो; ब्राह्मण हा गट आहे का?

गेल्या काही शतकांमध्ये ब्राह्मणत्वाची व्याख्या कशी झाली हे पाहणे मनोरंजक ठरेल. आपल्यासमोर एक मजकूर आहे ज्यामध्ये शिवाजीच्या राज्याभिषेक समारंभात सहभागी झालेले बनारसचे प्रसिद्ध पंडित गागाभट यांच्या नेतृत्वाखालील शिवाजीच्या दरबारातील पंडितांच्या परिषदेने दिलेला निकाल आहे असे मानले जाते; त्याचे शीर्षक आहे ‘श्येनविजातिधर्मनिर्णय’ (शेणवी जातिधर्माचा निर्णय); येथे शेणवी म्हणजे सारस्वत.

जरी सारस्वतांनी हा शब्द आपापसात ‘विद्यार्थी’ किंवा ‘प्राध्यापक’ असा वापरला आणि तो अध्यापन, लेखन आणि लेखा या व्यवसायात असलेल्यांना सन्माननीय पदवी म्हणून वापरला, तरी कऱ्हाड्यांनी तो शब्द ’श्येन’ (म्हणजे बहिरी ससाणा - दुष्काळात सारस्वतांनी बहिरी सशाण्याचे मांस खाल्ले होते, अशी आख्यायिका आहे) या शब्दापासून बनलेला निंदाव्यंजक शब्द म्हणून वापरला.

राजापूरमधील स्थानिक संस्कृत शाळेत सापडलेले निर्णयाचे हस्तलिखित १९१३साली पुणे येथील भारतीय संशोधक मंडळाच्या वार्षिक अहवालात पी. एन. पटवर्धन यांनी प्रकाशित केले होते. हस्तलिखितात दोन लेखकांची नावे आहेत: गोपाल गुर्जर आणि विनायक ज्यांनी पूर्वीच्या हस्तलिखिताची प्रत तयार केली होती. या मजकुराची सुरुवात रत्नागिरीतील राजापूर, संगमेश्वर, लांजे इत्यादी विविध ठिकाणांहून आलेल्या ब्राह्मणांच्या गटाने धर्मशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या करहाटक (कऱ्हाडे) ब्राह्मण समुदायाला लिहिलेल्या पत्राने होते.

हे पत्र काही कऱ्हाडे ब्राह्मणांनी पत्राच्या लेखकांना राजापूर शहरातील कोकणे किंवा शेणवी नावाच्या लोकांच्या गटाच्या धर्म (कायदा) आणि आचार (प्रथा) बद्दल प्रश्न विचारलेल्या पत्राचे उत्तर आहे. उत्तरात, रत्नागिरीहून आलेल्या पत्राचे लेखक १६६४साली गागाभट्ट यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील पंडितांच्या परिषदेने दिलेल्या निकालाचा उल्लेख करतात. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, १२४).

हा निकाल संकटाच्या काळात (आपद्धर्म) ब्राह्मणाच्या जीवनावर केंद्रित आहे. त्यात धर्मशास्त्रातील काही उतारे उद्धृत केले आहेत जे अशा परिस्थितीत (आपद्धर्मात) ब्राह्मणांचे वर्तन कसे असावे, हे सांगतात. मनुस्मृतीतील उद्धरणांच्या आधारे, असे म्हटले आहे की आपत्तीच्या काळात जेव्हा ब्राह्मणाकडे उदरनिर्वाहाचे इतर कोणतेही साधन नसते किंवा जेव्हा तो स्वतःचे धर्म करू शकत नाही तेव्हा त्याला काही निर्बंधांच्या अधीन राहून क्षत्रिय किंवा वैश्य व्यवसाय करण्याची परवानगी आहे.

पंडितांच्या निर्णयात संकटात ब्राह्मणाच्या आहाराबाबत धर्मशास्त्राचे आदेशदेखील आहेत; त्यात विविध स्मृतींचा उल्लेख आहे. ज्यानुसार ब्राह्मण आपद्धर्म म्हणून केवळ विशिष्ट परिस्थितीतच जीव तगवण्यापुरते विशिष्ट प्रकारचे मांस खाऊ शकतो. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, १२९).

Brahmin History
Karhade Brahmin History: कऱ्हाडे ब्राह्मणांची अनेक कुटुंबे गोव्याहून सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आली; स्थलांतरणाचा इतिहास

इथवर या निकालात काही वावगे नाही. सारस्वताचा आरोप पुढील भागात येतो जिथे निकाल पद्मपुराणाच्या शेवटच्या श्लोकातील एका कथेचा उल्लेख आहे. या कथेनुसार पृथ्वीवर साठ वर्षांचा दुष्काळ पडला ज्यामध्ये सर्व प्राणी नष्ट झाले. अनेक ब्राह्मण भुकेने आणि तहानेने मरण पावले. काहींनी गंगा नदीच्या काठावर स्थलांतर केले आणि भाज्या खाऊन जगले; काहींनी विविध तलाव आणि नद्यांभोवती आश्रय घेतला आणि पाणी पिऊन किंवा फळे, कमळाचे देठ, जंगली भात आणि गवत खाऊन आपल्या धर्माचे रक्षण केले.

काही ब्राह्मणांनी गोदावरी, रेवा, कालिंदी, कावेरी आणि शरयू नद्यांजवळ आश्रय घेतला आणि औषधी वनस्पती ब्राह्मी वापरून आपल्या धर्माचे रक्षण केले. जे कृष्णा नदीच्या काठावर गेले त्यांनी दर्भ, दुर्वा आणि गायीचे दूध पिऊन स्वतःचे पालनपोषण केले. काही ब्राह्मणांनी कमळाच्या बिया खाल्ल्या. या ब्राह्मणांनी स्वतःचे प्राण वाचवले आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचा धर्म वाचवला.

Brahmin History
Migration History: सरस्वती नदी आटल्यावर सारस्वत ब्राह्मण कोकणात, गोव्यात स्थायिक झाले; स्थलांतराचा इतिहास

पण, असेही काही ब्राह्मण होते ज्यांनी श्येन पक्षी व अन्य प्राण्यांचे मांस खाल्ले. या ब्राह्मणांनी स्वतःचे प्राण वाचवले, पण त्यांचा धर्म टिकवला नाही. (संदर्भ : पाटील, २०१० : कॉन्फ्लिक्ट, आयडेन्टिटी अँड नॅरेटिव्हस् - द ब्राह्मण कम्युनिटिज ऑफ वेस्टर्न इंडिया फ्रॉम द सेव्हेन्टींथ थ्रू नाइन्टीन सेंच्युरीज, १३१).

निर्णयात उद्धृत केलेला निकाल खरा आहे की नाही हेही आपल्याला माहीत नाही. वलाळीकर यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, मजकुरात उद्धृत केलेल्या निकालाची तारीख - वर्ष १६६४ - ही शिवाजी महाराजांच्या दरबारात गागाभट्ट उपस्थित असण्याशी सुसंगत नाही. कारण ते १६७३मध्येच तेथे आले होते. तसेच निकालाचा संदर्भही संशयास्पद आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या ब्राह्मण परिषदेला शेणवी नावाच्या जातिधर्माची चौकशी करण्यास सांगावे हे अत्यंत अशक्य आहे, कारण त्यांना या जातीची खूप आधीपासून माहिती असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com