Borim Bridge: 'लोकांनाही विकास हवा आहे, त्यासाठी त्यांना विश्‍वासात घेतले पाहिजे'; बोरीतील रस्त्याच्या अडचणी अन् मंत्र्यांचे आश्‍वासन

Borim Bridge Road: लोकांनाही विकास हवा आहे; पण त्यासाठी त्यांना विश्‍वासात घेतले तर कोणतीच अडचण येणार नाही. लोकांना गृहीत धरणे अयोग्य आहे.
Borim bridge land
Borim bridge land Dainik Gomantak
Published on
Updated on

योगानंद बोरकर

सौंदर्य सृष्टीने नटलेला माझा बोरी गाव. पर्वतावर श्रीसिद्धनाथ आणि पायथ्याशी जुवारी नदी. बोरी गाव हा पूर्ण गोव्याचा केंद्रबिंदू आहे. मध्यवर्ती ठिकाण. चारही दिशांनी आपल्याला प्रवास करण्याची मुभा. बोरी आणि लोटली मध्यभागी जुवारी नदी आणि बोरीचा पूल. दोन महिने होत आले, या पुलाचे काम अजून पूर्ण झालेले नाही.

दुचाकी वाहन चालवणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. चार चाकींचीही तीच स्थिती. सकाळी नोकरीला जाताना ३ किलोमीटरचा रस्ता पार करायला १५ ते २० मिनिटे लागतात. सकाळी ७.३० ते ९.३० संध्याकाळी ५.३० ते ७.३० वाहने संथ गतीने चालवावी लागतात.

मी बोरीचा नागरिक म्हणून मंत्री दिगंबर कामत यांना शनिवारी सकाळी १७ जानेवारी रोजी जाऊन भेटलो. त्यांना नमस्कार करून सविस्तर माहिती दिली.

लगेच आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून मला एका आठवड्यात पुलाचे पूर्ण काम होईल, याची हमी दिली. तसेच पुढच्या महिन्यात नवीन पुलाचे टेंडर निघणार, ही पण आनंदाची बातमी दिली. बोरी पुलासंबंधी मी व्हॉट्सऍपवर लोकांच्या प्रतिक्रिया बघतो, येता जाता वाहन चालक आणि इतरांकडून बरेच काही ऐकून मी त्रस्त झालो आणि म्हणून मग मंत्रिमहोदयांना भेटण्याचा निर्णय घेतला होता.

देवाने माणसाला जसे रेखीव आणि सुंदर शरीर दिले आहे, तसंच या सुंदर शरीराबरोबर विचार करणारे, चांगले वाईट ओळखणारे मनसुद्धा दिले आहे. इतर प्राणिमात्रांना मात्र देवाने मन, अंत:करण दिलं नाही.

त्यामुळेच ते माणसासारखा विचार किंवा विवेक करू शकत नाहीत. संस्कार हे फार प्रभावी बाळकडू आहे. संस्कारामुळे बुद्धी, विचार, आचार, ज्ञान, कर्तृत्व या सर्व गुणांचा उत्कर्ष होतो. अंगी मोठेपण येते. आपल्यामध्ये समस्त दु:खाचे कारण म्हणजे दुर्बलता हेच होय. केवळ मनुष्यालाच पूर्णत्वाचा लाभ करून घेता येतो.

आभाळ किती मोठे आहे. उंचावर उडून बघा. जगाच्या पलीकडे काय आहे. गरुड ढगाच्या पलीकडे जाऊन विहरत असतो, हे जीवन आणखी किती दिवस टिकणार आहे? जन्माला आलाच आहात तेव्हा जगात काही तरी खूण सोडून जा?

जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते वा-जे काही अध:पतनाला साहाय्य करते तो अधर्म होय आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास व आपल्या व्यक्तित्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करतो तो धर्म होय.

कोणतीही योजना नुसत्या उलट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाही. ती योजना राबवणारे हातही हवे असतात. हे हात एकमेकांच्या हाती गुंफलेले असतील, तर योजना राबवायला दसपट बळ येते.

हाताच्या या गुंफणीलाच ‘संघटन’ म्हणतात. समाजसेवेचे चिंतन आणि सेवेपाठची तळमळ प्रेमभाव निर्माण करते. त्यांच्या विचारांतील प्रत्येक धागा जिवंतपणे काम करतो.

आम्ही मंत्री महोदयांना सूचना, विनंती केली. त्यांनी तत्परता दाखवली. लगेच खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनेची चौकशी केली. जाणिवेची ऊर्जा त्यांच्यात आहे. कृतिशीलता महत्त्वाची. लक्षवेधक काम, समाज हितरक्षणाचा तो गाभा. आपली कार्यक्षमता दाखवण्याची त्यांची तेवढी उंची आहे.

Borim bridge land
New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

कारण त्याच्याकडे कार्यानुभव आहे. आपण भक्तीने काम केले तर समोरचा माणूस प्रभावित नक्की होतो. लोकांच्या जीवनाविषयीचा प्रश्‍न आहे. हा तो त्यांनी गांभीर्याने घेतला. सक्रियतेने त्यांनी जबाबदारी स्वीकारली. कठीण गोष्टी सहज करून दाखवतात. त्यालाच प्रतिनिधी म्हणतात.

साधारण रोजच्या जीवनात ‘विचार’ नावाच्या शक्तीकडे फारसे विचारपूर्वक पाहिले जात नाही.प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून लोकांच्या समस्या सोडवणे, हेच तर लोकप्रतिनिधीचे काम आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ते केले पाहिजे.

Borim bridge land
Borim Goa : सफर गोव्याची! निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव; साधेपणाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेले 'बोरी'

लोकांचे म्हणणे ऐकणे व त्यावर त्वरित सक्रिय होत यंत्रणेलाही कार्यप्रवण करणे महत्त्वाचे आहे. जिथे काम होत आहे, तिथल्या लोकांच्या समस्या आधी जाणून घेणे, त्यात लक्ष घालणे व त्या सोडवणे याला प्राथमिकता दिली पाहिजे. आज अनेक ठिकाणी होणारा विरोध दिसतो, पण लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला कमी झालेला संपर्क मात्र दिसत नाही. लोकांनाही विकास हवा आहे; पण त्यासाठी त्यांना विश्‍वासात घेतले तर कोणतीच अडचण येणार नाही. लोकांना गृहीत धरणे अयोग्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com