Agonda: सफर गोव्याची! स्वच्छ किनारा लाभलेले, लोककलेचा वारसा जपणारे 'आगोंद'

Agonda Village Goa: भिरंणा, आंबे, फणस, काजू हा अगदी सहजच मिळणारा इथला सुखद मेवा आहे. त्याशिवाय मी रमलो, ते इथल्या रम्य वातावरणात कारण माझे घर अगदी नदीच्या काठी आहे.
Agonda Village Goa
Agonda Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

असं म्हणतात, मेल्यावर स्वर्ग किंवा नरक दिसतो, मी मात्र जितेपणीच स्वर्गात राहतो. कारण माझा जन्म झाला, तो आगोंद या गावात, अर्थात माझा निसर्गसंपन्न गाव आगोंद हा माझ्यासाठी स्वर्गाहून कमी नाही.

भिरंणा, आंबे, फणस, काजू हा अगदी सहजच मिळणारा इथला सुखद मेवा आहे. त्याशिवाय मी रमलो, ते इथल्या रम्य वातावरणात कारण माझे घर अगदी नदीच्या काठी आहे. माड-पोफळीच्या बागायतीचा शेजार, अंगणात तुळशी वृंदावन, अन् मीच या निसर्गाचा पुजारी. आदरातिथ्य ही माझ्या घराची संस्कृती अन् आमच्या जगण्यात आलेली वृत्ती.

आगोंद हे गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यात वसलेले एक सुंदर व निसर्गरम्य गाव आहे.

शांत समुद्रकिनारा, हिरवीगार निसर्गसंपदा आणि साधी-सोप्या जीवनशैलीमुळे आगोंदा गाव विशेष ओळखले जाते. पर्यटनाच्या नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे हे गाव आज देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

अगोंदा गावाचा समुद्रकिनारा हा गावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा समुद्रकिनारा स्वच्छ, रुंद आणि शांत आहे.

इतर लोकप्रिय गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे येथे प्रचंड गर्दी नसल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवता येतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी आगोंदा किनारा देशी-विदेशी पर्यटकांत प्रसिद्ध आहे.

आगोंद गावातील लोकांचे जीवन साधे आणि कष्टकरी आहे. मासेमारी, शेती आणि पर्यटन हे येथील मुख्य व्यवसाय आहेत. स्थानिक लोक अतिशय आपुलकीने पर्यटकांचे स्वागत करतात. गावात मराठी, कोंकणी आणि इंग्रजी भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.

Agonda Village Goa
Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनही समृद्ध आहे. गणेश चतुर्थी, शिगमो, नाताळ यांसारखे सण येथे उत्साहात साजरे केले जातात. देवळे, चर्च आणि स्थानिक उत्सव गावाच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहेत. लोककला, पारंपरिक संगीत आणि नृत्य यांचा वारसा आजही जपला जातो.

पर्यटनाच्या दृष्टीने अगोंदा गाव सतत विकसित होत आहे. येथे बीच हट्स, होमस्टे, रिसॉर्ट्स तसेच योगा आणि ध्यान केंद्रे उपलब्ध आहेत. निसर्गप्रेमी, लेखक, कलाकार आणि शांतता शोधणारे लोक येथे आवर्जून भेट देतात.

Agonda Village Goa
Benaulim: सफर गोव्याची! मध्यरात्री घोड्यांच्या टापांचा आवाज येण्याची दंतकथा, रूपेरी वाळूचा समुद्रकिनारा लाभलेले 'बाणावली'

एकूणच, अगोंदा गाव म्हणजे निसर्ग, शांतता आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे सुंदर मिश्रण आहे. आधुनिक धावपळीच्या जीवनात मनःशांती शोधणाऱ्यांसाठी आगोंद गाव हे खऱ्या अर्थाने एक आदर्श ठिकाण आहे. आधुनिकतेचा स्पर्श आगोंदलाही झाला आहे, त्यामुळं इथलं गावपण टिकवणं हेच आमच्यासाठी आता आव्हान आहे.

नीलेश पा. प्रभू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com