

Akshaye Khanna Alibaug farmhouse: बॉलिवूडमध्ये काही कलाकार प्रसिद्धीसाठी सतत प्रयत्न करतात, पण अक्षय खन्ना मात्र त्याला अपवाद आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटात न राहता, त्याने जीवन शांतपणे जगण्याची कला आत्मसात केलीये. सोशल मीडियाचा गदारोळ, विमानतळावरील फोटो किंवा रेड-कार्पेटच्या फेऱ्यांची गरज न भासलेला तो एकमेव तारा आहे. अक्षयच्या चाहत्यांना पडद्यावर दिसणाऱ्या अक्षयपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्ती रस वाटतो.
शूटिंग नसताना अक्षय खन्ना आपला बराचसा वेळ अलिबागच्या फार्महाऊसवर घालवतो. हे फार्महाऊस निसर्गाच्या अगदी जवळ आहे. अनेक मुलाखतींमधून देखील हे समोर आलेय की शूटिंग नंतर अक्षय जो गायब होतो तो याच फार्महाऊसमध्ये.
फार्महाऊसवर प्रवेश करतानाच घोड्यांचा तबेला आणि दुसऱ्या टोकाला खास घोडेस्वारीचे क्षेत्र आहे. येथे एक सुंदर तलाव, अनेक घोडेआणि काही गोंडस ससे सुद्धा आहेत.
बंगल्याला अतिशय सभ्य आणि प्रभावी रचना आहे. बाहेरील भागात सुंदर शांत बाग, झोपाळे, एकापेक्षा जास्त कबानास आणि लाउंज क्षेत्रासह मोठा स्विमिंग पूल आहे. या फार्महाऊसचे एक वैशिष्ट्य म्हणजे एक आरामदायक 'सीटआऊट' क्षेत्र, जे हुक्का आणि छान सजावटीसह सुसज्ज आहे.
अक्षय खन्नाला खासगी आयुष्य खूप प्रिय असल्याने मालमत्तेच्या यादीत जुहू आणि मलबार हिलच्या घरांसोबतच टार्डेओमधील अपार्टमेंटची देखील भर आहे. अक्षय खन्नाने मोठ्या थाटामाटात न जगताही भव्य जीवन जगण्याची कला साध्य केली आहे.अलिबाग फार्महाऊस
अक्षय खन्नाच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वात आणि वास्तविक जीवनातील स्वभावात एक प्रकारचे साम्य आहे , हेच की नियंत्रित, विचारपूर्वक आणि भेदक. 'दिल चाहता है'चे दुःख असो, 'सेक्शन ३७५'ची नैतिक गुंतागुंत असो, किंवा 'धुरंधर'मधील रेहमान डकैतचा दबलेला रौद्रपणा असो, तो अभिनयाची गती वापरतो, फक्त दिलेले डायलॉग नाही. त्याच्या बोलण्यातला प्रत्येक विराम, प्रत्येक कटाक्ष, प्रत्येक हास्य अभिनयाच्या नाट्यमयतेपेक्षा खूप अधिक वजनदार असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.