Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Akshaye Khanna havan video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसलेल्या अक्षयचा एक दुर्मिळ व्हिडिओ नुकताच समोर आला असून, तो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे
Akshaye Khanna home
Akshaye Khanna homeDainik Gomantak
Published on
Updated on

Akshaye Khanna Alibaug Viral Video: बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यशाचे नवनवीन विक्रम राहायला सुरुवात केली असून, अक्षयने साकारलेल्या 'रेहमान डकैत' या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र, चित्रपट यशाच्या शिखरावर असतानाही अक्षय खन्ना नेहमीप्रमाणे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणेच पसंत करतोय. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसलेल्या अक्षयचा एक दुर्मिळ व्हिडिओ नुकताच समोर आला असून, तो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

प्रसिद्धीच्या झगमगाटाऐवजी शांततेचा शोध

जेथे कलाकार आपल्या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये करतात, तिथे अक्षय खन्नाने स्वतःला साधेपणात गुंतवून घेतले आहे. अलिबाग येथील त्याच्या निवासस्थानी त्याने नुकतीच एक विशेष पूजा संपन्न केली. शिवम म्हात्रे नावाच्या पुरोहितांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पूजेचा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनतर तो प्रचंड गाजतोय. यात अक्षय खन्ना अतिशय शांत चित्ताने धार्मिक विधी करताना दिसून येत असून, त्याचा हा आध्यात्मिक अवतार पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत.

वास्तू शांती आणि सकारात्मकतेचा संकल्प

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयने आपल्या अलिबागच्या घरातील दोष निवारण आणि सुख-समृद्धीसाठी 'वास्तू शांती' हवनाचे आयोजन केले होते. वास्तू शांती हा विधी घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी केला जातो. 'रेहमान डकैत' सारखी आक्रमक आणि तीव्र भूमिका पडद्यावर जिवंत करणाऱ्या अक्षयचा प्रत्यक्ष जीवनातील हा संयमी आणि धार्मिक स्वभाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू समोर आणतो.

Akshaye Khanna home
Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाचा वर्षाव

अक्षय खन्ना हा अशा मोजक्या कलाकारांपैकी एक आहे जो कॅमेरामागे स्वतःचे खाजगी आयुष्य अत्यंत गुप्त ठेवतो. त्यामुळेच त्याच्या घराची आणि या पूजेची झलक चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरली. सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून, "एक सच्चा कलाकार जो यशाने हुरळून जात नाही," अशा शब्दांत नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. ग्लॅमरच्या जगात राहूनही स्वतःची पाळेमुळे संस्कृतीशी जोडून ठेवण्याच्या त्याच्या या कृतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com