Inspector Zende Konkani Rap: ..हांव तेका आता पोळोयता! 'इन्स्पेक्टर झेंडे’ला गोवन टच! मनोज वाजपेयीच्या सिनेमात कोकणी रॅपचा कल्ला

Amit Naik Rap Inspector Zende: स्वतः अमित नाईक यांनी जेव्हा हा ट्रेलर पहिल्यांदा पाहिला आणि त्यात आपल्या आवाजातील गीताच्या कोकणी ओळी ऐकल्या तेव्हा त्यांना बेहद्द आनंद झाला.
Amit Naik rap song Inspector Zende
Amit Naik rap song Inspector ZendeDainik Gomantak
Published on
Updated on

चार्ल्स शोभराज या बहुचर्चित गुन्हेगाराला महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी गोव्यात जेरबंद केले आणि त्यांचे नाव सर्वत्र झाले. मधुकर झेंडे यांच्या या कर्तबगारीवर आधारित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा हिंदी चित्रपट आजपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. 

चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडल्यामुळे या सिनेमाचे महत्त्वाचे चित्रीकरण गोव्यात होणे हे साहजिकच होते आणि ते तसेच झालेही आहे पण त्याचबरोबर गोव्याचा प्रसिद्ध रॅपर अमित नाईक, जो वेकिंग ग्रंट या नावाने सर्वत्र ओळखला जातो, त्याचे एक कोकणी रॅप गीत या चित्रपटात वापरले गेले आहे.‌

या सिनेमाचा ट्रेलर, जो सध्या मोठ्या उत्सुकतेने पाहिला गेला जात आहे, त्यात हे गाणे पार्श्वसंगीत म्हणून वापरले गेले आहे. स्वतः अमित नाईक यांनी जेव्हा हा ट्रेलर पहिल्यांदा पाहिला आणि त्यात आपल्या आवाजातील गीताच्या कोकणी ओळी ऐकल्या तेव्हा त्यांना बेहद्द आनंद झाला. 

हे गीत कसे निर्माण झाले याची कहाणीही रोचक आहे. गेल्या इफ्फीत अमितची भेट संगीतकार संकेत साने यांच्याशी झाली होती.‌ या इफ्फीत गोवा विभागात सादर झालेल्या 'आदेवस' या लघुपटाला  अमितने संगीत दिले होते.‌

संकेत साने यांनी अमितला त्या संध्याकाळी संदेश पाठवून आपल्याला भेटायला बोलावले.‌ दुसऱ्या दिवशी जेव्हा अमित त्यांना भेटला तेव्हा त्यांनी अमितला ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटातील एक दृश्य सांगीतले आणि तिथे वापरता येण्याजोगी रॅप शैलीत एखादी गीतरचना करायला सांगितले.

अमितने त्याचवेळी काही हिंदी ओळी लिहिल्या आणि नंतर त्याच्यापाशी वेळ खूप कमी असल्यामुळे सानेंना त्याने एक पर्याय दिला. त्याने सांगितले, 'मी गीत कोकणीत लिहीन आणि नंतर ते हवे तर त्याचा हिंदीत अनुवाद करू शकतात.' त्याने तिथल्या तिथे आठ दहा कोकणी ओळी लिहिल्या आणि मोबाईलवर रॅप शैलीत रेकॉर्ड करून त्यांना दिल्या आणि फारशी काही अपेक्षा न करता तो तिथून निघूनही गेला. 

एका महिन्यानंतर संकेतने त्याला निरोप पाठवला की त्याचे कोकणी रॅप गीत सिनेमातील त्या विशिष्ट दृश्यासाठी अनुरूप आहे.

त्या गीताचा अनुवाद करून अमितने आपला फायनल ट्रॅक साखळी येथील दत्तू सावळ यांच्या स्टुडिओत रेकॉर्ड केला. दरम्यान सिनेमाचे दृश्य आधीच्या कोकणी ट्रॅकचा वापर करून शूट झाले होते. नंतर पोस्ट प्रॉडक्शनमध्ये फायनल ट्रॅकचा अंतर्भाव करण्यात आला.  

चित्रपटात जेव्हा इन्स्पेक्टर झेंडे चार्ल्स शोभराजला पर्वरी येथील 'ओ कोकेरो' या रेस्टॉरंटमध्ये पकडतात तेव्हा तिथे एका लग्नाचे रिसेप्शन चालू होते.‌ या रिसेप्शनचा भाग म्हणून हे कोकणी गीत या चित्रपटात वापरले गेले आहे. अमित म्हणतो, 'या गीतात फक्त आठ-दहा कोकणी ओळी आहेत पण चला निदान कुठेतरी सुरुवात झाली आहे.' 

Amit Naik rap song Inspector Zende
Inspector Zende: साल 1986 ! चार्ल्स शोभराजला गोव्यात पकडले, पोलीस अधिकारी झेंडेंची गोष्ट; मनोज वाजपेयी साकारणार मुख्य भूमिका

अमित हा गोव्याचा नामवंत रॅप गायक आहे. गोव्यात कोकणी रॅपची सुरुवात करणाऱ्यांपैकी तो एक आहे. आपल्या कोकणी रॅपला बॉलीवूडमधील एका संगीतकाराने दिलेली मान्यता त्याला नक्कीच आनंदीत करून गेली आहे. तो म्हणतो, 'हे पाऊल लहानसे आहे, पण अभिमानाचे आहे.'

Amit Naik rap song Inspector Zende
बोलता बोलता रॅप करणारा, गोमन्तकीयांचा लाडका 'वेकींग ग्रॅण्ट'; नेम, फेम, पैसा! अमित नाईकची दिलखुलास मुलाखत

अमितने 'इन्स्पेक्टर झेंडे'साठी लिहिलेली कोकणी रॅप रचना :

माटवान लिपोन बोसला खुंय तुजी बायल?

सगळे सोदता तिका घोरा सांज सोकाळ

भायर सोर, लीपोन राव नाका

वाज येयला माका

दोळे तुका पोवोंक माझे आशेता

तुजेशिवाय कसो हांव जियेता

हुर्राक, व्हिस्की हांव हांगा पिएता

भायर सोर, कोणाक तू हांगा भिएता

कोणुय येंव, हांव तेका आता पोळोयता....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com