काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

The Bengal Files: चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत, 'आमचा आवाज दाबला जात आहे,' असे अग्निहोत्री म्हणाले.
The Bengal Files Movie Trailer
The Bengal Files Movie TrailerDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगाल: वादग्रस्त ठरलेल्या द काश्मीर फाईल्सनंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता 'द बंगाल फाइल्स' घेऊन येत आहेत. चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, शनिवारी कोलकाता येथे चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. यामुळे १२ वाजता प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन एक तास उशीराने झाले. यावेळी पोलिसही घटना दाखल झाले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. 'आमचा आवाज दाबला जात आहे,' असे अग्निहोत्री म्हणाले.

“काही लोकांनी येऊन येथील तार कापल्या, या चित्रपटातून बंगलाचा इतिहास समोर येणार आहे. प्रत्येक बंगाली आणि भारतीय नागरिकासाठी हा चित्रपट पाहावा असा आहे. पण, काही लोक याविरोधात आहेत. ते लोक कोण आहेत हे सर्वांना माहित आहे,” असे अग्निहोत्री म्हणाले.

The Bengal Files Movie Trailer
Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

"आमच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. आमचा सगळा वेळ वकिलांसोबत लढण्यात जात आहे. येथील मल्टिफेक्स चेनने हा ट्रेलर चालविण्यास नकार दिला. आताही एका खासगी हॉटेलमध्ये ट्रेलर लॉन्च होत असताना हा प्रकार घडला. त्यांची मंजूरी घेतल्यानंतरच कार्यक्रम सुरु करण्यात आला पण, मॅनेजरने कार्यक्रम बंद पाडला," असा आरोप अग्निहोत्री यांनी केला. विवेक अग्निहोत्री यांनी यावेळी सर्वांनी चित्रपटाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली.

'द बंगाल फाइल्स'ची कथा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिली आहे आणि त्यांनीच त्याचे दिग्दर्शनही केले आहे. त्याचबरोबर अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी त्याच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार असे अनेक कलाकार यात दिसणार आहेत.

THE BENGAL FILES Official Trailer WATCH

The Bengal Files Movie Trailer
Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्कंद फाइल्स' या चित्रपटांवरही चित्रपट बनवले आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रदर्शनापूर्वीच बराच गोंधळ घातला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com