Viral Photo: थालापती-त्रिशामध्ये नेमकं काय शिजतंय? गोव्याला येताना सापडले कॅमेऱ्याच्या कैदेत

Thalapathy Vijay Trisha Krishnan Dating: साऊथ सुपरस्टार थालापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांचा एअरपोर्टवरचे व्हिडीओ आणि फोटो बरेच व्हायरल होतायत.
Thalapathy Vijay Trisha Krihsnan Dating:  थालापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्यामध्ये काहीतरी विशेष शिजत असल्याच्या चर्चा रंगत आहेत
Thalapathy Vijay Trisha Krihsnan Dainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Trisha Dating

अलीकडेच दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने तिचा प्रियकर अँटोनी याच्यासोबत गोव्यात लग्नगाठ बांधली होती. कीर्ती आणि अँटोनी यांचा विवाह अत्यंत खासगी असल्याने काही जवळच्या मंडळींनीच याला हजेरी लावली. कीर्तीच्या लग्नानंतर आता मात्र काही वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे, या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या थालापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्यामध्ये काहीतरी विशेष शिजत असल्याच्या चर्चा रंगत आहेत आणि साऊथ सुपरस्टार थालापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांचा एअरपोर्टवरचे व्हिडीओ आणि फोटो बरेच व्हायरल होतायत.

गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्रिशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र त्रिशा किंवा विजय यांपैकी कोणीच या चर्चांना खतपाणी घातलं नाही किंवा यांना खोडून सुद्धा काढलं नाही, मात्र आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे पुन्हा कुजबुज सुरु झाली आहे.

Thalapathy Vijay Trisha Krihsnan Dating:  थालापती विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्यामध्ये काहीतरी विशेष शिजत असल्याच्या चर्चा रंगत आहेत
Keerthy Suresh Wedding: नवरी नटली...! उरले काही तास, कीर्ती - अँटोनी गोव्यात घेणार सात फेरे

तर झालं असं की त्रिशा आणि विजय हे गोव्याला निघताना चेन्नईच्या एअरपोर्टवर सोबत होते. या व्हिडीओ नंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे, एकाने तर कीप इट प्रायव्हेट असा कमेंट देखील केलाय.

कीर्ती सुरेशने बांधली गोव्यात लग्नगाठ:

कीर्ती सुरेश नेमकी कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता आणि डिसेंबर १२ ला कीर्तीने अँटोनीच्या गळ्यात माळ घातली. अँटोनी आणि कीर्ती हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. कीर्ती ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर अँटोनी एक उद्योजक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com