Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: सोनू कोणाशी बांधणार लग्नगाठ? टप्पूची वाढली घालमेल; साखरपुड्यावर फॅन्स चिडले

Sonu and Abhinav engagement in TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोच्या सध्याच्या ट्रॅकवर प्रेक्षक अजिबात खूश नाहीत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Sonu and Abhinav engagement in TMKOCDainik Gomantak
Published on
Updated on

Tapu Sonu Marriage Track Disappoints Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fans

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोच्या सध्याच्या ट्रॅकवर प्रेक्षक अजिबात खूश नाहीत. यामध्ये आत्माराम तुकाराम भिडेची लेक सोनू (सोनालिका) हिच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जात आहे. अलिकडच्या एपिसोडनंतर, काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. टप्पू (Nitish Bhaluni) आणि सोनू (Khushi Mali) यांच्या विभक्त होण्याच्या कहाणीमुळे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

आगामी एपिसोडमध्ये काय होणार?

दरम्यान, आगामी एपिसोडमध्ये जेव्हा पिंकू, गोली आणि गोगी क्लब हाऊसमध्ये टप्पूला सांगतील की सोनूने अभिनवशी साखरपुडा केला आहे तेव्हा टप्पूसह गोकुळधाम सोसायटीतील लोकांना मोठा धक्का बसेल. हा तोच मुलगा आहे जो अलिकडेच सोनूबरोबर लग्नाची बोलणी करण्यासाठी आला होता.

दुसरीकडे, टप्पू सेनाला चिंता सतावत आहे की, हे लग्न रोखण्यासाठी लवकर पाऊले उचलली नाहीतर सोनू अभिनवशी लग्न करुन गोकुळधाम कायमची सोडून जाईल. दरम्यान, जेव्हा टप्पू काहीतरी करण्याच्या उद्देशाने क्लब हाऊसमधून बाहेर पडतो, तेव्हा तो सोनूला अभिनवसोबत गाडीत बसताना पाहतो, पण गाडी चालू लागताच, सोनू टप्पूला खुणावून सांगते की, तिला हे लग्न करायचे नाही. हे पाहून टप्पू वेळ न दौडता गाडीच्या मागे धावतो.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Chhaava: शत्रूला गाफील ठेवणारी 'अनोखी' युद्धकला; विकी कौशलच्या छावा चित्रपटात दडलंय 'पंचतत्त्वांचं गुपित'

नेटिझन्सनी प्रतिक्रिया

दुसरीकडे मात्र, प्रोमो पाहिल्यानंतर नेटिझन्सनी त्याला एक क्रिंज आणि निराशाजनक ट्रॅक म्हटले. निर्मात्यांनी प्रोमो शेअर केल्यानंतर एका यूजरने सोशल मीडियावर (Social Media) लिहिले की, "हा सगळा ड्रामा आहे." तर दुसऱ्याने लिहिले की, "हा शो इतका क्रिंग झाला आहे का?" तर तिसऱ्याने कमेंट केली की, "हा शो अजूनही चालू आहे का?" तर चौथा म्हणाला, "हे सगळं सास बहू मालिकेसारखे वाटतं."

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Chhava Release Date: हर हर महादेव! सगळे रेकॉर्ड तोडायला येतोय 'छावा'; 'या' दिवशी होणार प्रदर्शित..

तारक मेहता का उल्टा चष्मा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' जुलै 2008 पासून सुरु आहे. याची निर्मिती नीला असित मोदी आणि असित कुमार मोदी यांनी केली आहे. या मालिकेची कहाणी मुंबईतील गोकुळधाम सोसायटीची आहे, जिथे देशातील वेगवेगळ्या प्रांतातील, संस्कृतीचे आणि परंपरांचे लोक एकमेकांसोबत आनंदाने राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com