गोमन्तक डिजिटल टीम
कथानक आणि दमदार अभिनयाची हमी देणारा चित्रपट ‘छावा’ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आहे.
या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे
या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना या सिनेमात काम करत आहे.
आता ‘पुष्पा २’ या बहुप्रतिक्षित पॅन इंडिया चित्रपटाबरोबर टक्कर टाळण्यासाठी ‘छावा’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
‘छावा’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या आनंदासाठी आणि बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी तारीख पुढे ढकलत आता १४ फेब्रुवारी २०२५ ही तारीख निवडली आहे.
हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रसिद्ध मराठी पुस्तकावर आधारित आहे.