गोवा – मुंबई फ्लाईटच्या तिकिटासाठी मोजले 4 लाख रुपये, गायक राहुल वैद्यला इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका

Goa - Mumbai Indigo Flight: विमानप्रवासाच्या इतिहासातील हा खराब दिवस असल्याचे गायक राहुल वैद्य याने म्हटले आहे.
Rahul Vaidya Indigo issue| Indigo flight controversy
Rahul Vaidya Goa Mumbai flightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका गायक राहुल वैद्यला देखील बसला आहे. वैद्यला गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी चार लाखाहून अधिक पैसे खर्च करावे लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून देशभरात इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. कंपनीच्या ३०० हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

गायक राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टोरी ठेवत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. त्याच्या विमानप्रवासाच्या इतिहासातील हा खराब दिवस असल्याचे त्याने म्हटले आहे. गुरुवारी इंडिगोच्या दिल्ली, मुंबईसह गोव्यातून देखील अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट्सचा फटका वैद्यला बसला. कोलकत्ता येथे असलेल्या शोसाठी जायला विलंब होत असल्याने त्याला पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली.

Rahul Vaidya Indigo issue| Indigo flight controversy
Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

राहुल वैद्यने गोवा विमानतळावरुन उदास चेहऱ्याने फोटो शेअर केला आहे.  “विमानप्रवासातील हा एक सर्वात खराब दिवस आहे, आणि आमचा कोलकत्तामध्ये रात्री शो आहे. आणि अजुनही आम्हाला माहिती नाही आम्ही तिथे पोहोचणार आहोत की नाही?,” असे राहुलने पोस्ट केलेल्या स्टोरीत म्हटले आहे.

दुसऱ्या एका स्टोरीच्या पोस्टमध्ये त्याने विविध बोर्डिंग पासचे फोटो शेअर केले आहेत. देशांर्गत विमानप्रवासासाठी तिकिटावर ४.२ लाख रुपये खर्च केल्याचे त्याने या स्टोरीत म्हटले आहे. हे पास केवळ मुंबई पर्यंतच्या प्रवासासाठी आहेत, तिथून कोलकत्तासाठी वेगळे पैसे लागणार असल्याचे त्याने म्हटले आहे. देशांर्गत प्रवासासाठी पहिल्यांदाच एवढे पैसे मोजल्याचे राहुल वैद्यने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rahul Vaidya Indigo issue| Indigo flight controversy
मुलगा पसंत नाही! साखरपुड्यानंतर लग्नास नकार, बेळगावातील मुलीवर 25 लाख खर्च केलेल्या कोल्हापूरच्या तरुणाची थेट कोर्टात धाव

दुसरीकडे टेलिव्हिजनवरची अभिनेत्री निया शर्माने देखील देशांर्गत फ्लाईटसाठी ५४ हजार रुपये खर्च केल्याचे तिने सांगितले. तिने देखील याप्रकरणी पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. माझा बोर्डिंग पास ५४ हजार रुपयांचा असून विशेष म्हणजे ही देशांर्गत फ्लाईट आहे, असे निया शर्माने म्हटलंय. दरम्यान, इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या फ्लाईट्समुळे कंपनीने प्रवासी आणि भागधारकांची माफी मागितली आहे.

गेल्या तीन दिवसांत इंडिगोच्या ३०० हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, बंगळुरु, गोवासह देशात अनेक ठिकाणी फ्लाईट्स रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, कंपनी विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com