मुलगा पसंत नाही! साखरपुड्यानंतर लग्नास नकार, बेळगावातील मुलीवर 25 लाख खर्च केलेल्या कोल्हापूरच्या तरुणाची थेट कोर्टात धाव

Belagavi marriage dispute: तरुणाने तरुणीला विविध भेटवस्तू खरेदी करुन देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च केले.
Belagavi girl denies marriage
Belagavi marriage disputeDainik Gomantak
Published on
Updated on

कोल्हापूर: साखरपुडा झाल्यानंतर मुलगा पसंत नसल्याचे सांगत मुलीने लग्नास नकार दिला. याप्रकरणी कोल्हापूरच्या तरुणाने कोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आलीये. तरुणाने मुलीवर २५ लाख रुपये खर्च केल्याचे त्याने तक्रारीत म्हंटल आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या तरुणाने बेळगावच्या तरुणीला लग्नासाठी मागणी घातली. तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोघांचा साखरपुडा देखील उरकला. यामध्ये दोन्हीकडचे कुटुंबीय देखील सहभागी होते.

यानंतर तरुणाने तरुणीला विविध भेटवस्तू खरेदी करुन देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च केले. पण, अचानक तरुणीने मुलगा पसंत नसल्याचे कारण देत लग्नास नकार दिला.

Belagavi girl denies marriage
Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

तरुणीने लग्नास नकार दिल्याचे समजताच तरुणाच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. माहिती घेण्यासाठी तरुणीच्या घरच्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

दरम्यान, तरुणाने याप्रकरणी दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तरुणाला पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सूचना केली.

तरुणाने उद्यमबाग पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Allahabad High Court Custodial Torture Ruling
Goa Suicide Case
Goa Government Spending
Parul Gulati Goa Villa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com