
मुंबई: 'काँटा लगा' या प्रसिद्ध गाण्यातून झळकलेली तसेच बिग बॉसमुळे घरांघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. शेफालीच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बिग बॉस शोवर देखील जोरदार टीका केली जात आहे. शेफाली शिवाय बिग बॉस शो निगडीत आणखी दोघांच्या यापूर्वी मृत्यू झाल्याने सोशल मिडियावरुन आता बिग बॉस शो वर टीका केली जातेय.
शेफालीचे मुंबईतील राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफाली केवळ ४२ वर्षांची होती. सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असलेल्या शेफालीच्या निधनानंतर सोशल मिडियावर चाहत्यांनी शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, बिग बॉस शो वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बिग बॉस संबधित यापूर्वी सिद्धार्थ शुक्ला आणि सोनाली फोगाट यांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षात बिग बॉसच्या घरात राहून आलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याने बिग बॉसचे घर शापित असल्याचा आरोप सोशल मिडियावरुन केला जात आहे.
हिमांशी खुराणाची स्टोरी चर्चेत
शेफालीच्या आकस्मिक मृत्यूनंतर हिमांशी खुराणाने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत बिग बॉस शापित असल्याचे म्हटले आहे. यात तिने शेफाली सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हिमांशीच्या या स्टोरीवरुन सोशल मिडियावर बिग बॉसबाबत चर्चेला उधाण आले आहे.
सोनाली फोगाट, सिद्धार्थ आणि आता शेफालीचा मृत्यू
बिग बॉस शोचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा २०२१ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ४० वर्षीय सिद्धार्थ शरीरिकदृष्ट्या फिट असताना आकस्मिक झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर २०२३ मध्ये बिग बॉसची स्पर्धक, टीक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी त्यांच्या स्वीय सहाय्यकासोबत इतरांना अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आता शेफाली जरीवालाचे देखील निधन झाले असून तिचा देखील बिग बॉसशी संबंध होता. त्यामुळे सोशल मिडियातून बिग बॉसवर टीका केली जात आहे. सोशल मिडियावर देखील #Biggboss टॅग ट्रेंडिगला आला आहे.
दरम्यान, शेफालीच्या आकस्मिक निधनाबाबत पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. पोलिसांनी शेफालीचा पती पराग त्यागी याची देखील चौकशी केली जात आहे. शेफालीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकाराचा झटका सांगितले जात असले तरी अद्याप मूळ कारण समोर आलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.