
Pushpa 2 The Rule Movie X Review In Marathi
पुणे : "झुकेगा नाही साला" म्हणणारा पुष्पा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतला स्टार म्हणजेच अल्लू अर्जुन आणि तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी रश्मीका मंधाना पुष्पाच्या गोष्टीचा पुढचा भाग घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. या दोघांशिवाय फहाद फसील सुद्धा पुष्पाच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळतोय.
काही दिवसांपासून "सोसेकी" या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंच होतं आणि आता प्रदर्शित झालेला चित्रपट देखील देशभरातील चित्रपटप्रेमींना आकर्षित करण्यात यशस्वी होतोय. अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरल्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर लोकांनी ट्विटर म्हणजेच X वरून अभिप्रायांचा वर्षाव सुरु केलाय..
प्रेक्षकांना पुष्पा-१ प्रमाणेच दुसरा भाग सुद्धा तेवढाच आवडतोय. काही लोकं याला मेगा-ब्लॉगबस्टर म्हणतायत तर काहीजण अल्लू अर्जुनाच्या अभिनयाला डोक्यावर घेतायत. या चित्रपटाचे फाईट सीन्स खूप लक्ष देऊन आणि बारकाईने दिग्दर्शित केले गेले आहेत, शिवाय चित्रपटातल्या संवादांना सुद्धा प्रेक्षकांना पूर्णवेळ खेचून धरण्यात यश मिळालंय, याचं सगळं श्रेय अभिनय करणाऱ्या कलाकारांना तसंच चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार याला जातं.
मात्र दुसऱ्या बाजूला काही प्रेक्षक असेही आहेत ज्यांना पुष्पाचा दुसरा भाग रुचलेला नाही. पुष्पा-१ने लावलेली आग पुढे नेणं दुसऱ्या भागाला हवं तसं जमलेलं नाही असं प्रेक्षक म्हणतायत. चित्रपटाची गाणी मुख्य गोष्टीलाच मागे पडतायत का असा प्रश्न काही जणांना पडलाय.
बाकी अल्लू अर्जुनच्या सनसनाटी परफॉर्मन्समुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. पुष्पाच्या पहिल्या भागात एका गाण्यासाठी आलेली सामंथा सुद्धा दुसऱ्या भागात नसल्याने अनेकांचं हिरमोड झालाय.
तुम्ही जर का अजून पुष्पा-२ पहिला नसेल तर नक्कीच चित्रपट गृहात जाऊन या, कारण भंवरसिंह शेखावत म्हणजेच फहाद फसील आणि पुष्पा यांच्यामध्ये पेटलेला भडका विझतो की नाही हे उत्तर या चित्रपटातून मिळणार आहे, शिवाय पुष्पा आणि श्रीविल्ली यांचा संसार, रश्मीकाचा दिलखेचक अभिनय आणि फहादचा टॉपनॉक अनुभवायचा असेल तर चित्रपट पाहावयाचा लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.