

Namita Thapar Goa vacation Photos: 'शार्क टँक इंडिया' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या परीक्षिका आणि एम्क्युर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर सध्या गोव्यातील व्हेकेशनमुळे चर्चेत आहेत. नमिताने तिच्या गोव्यातील शांत आणि निवांत सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहणाऱ्यांना 'ट्रॅव्हल गोल्स' वाटतायत.
नमिता थापर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "गोवा एक व्हायब, ही एक भावना आहे. 'शार्क टँक'च्या १२-१२ तासांच्या शूटिंगमुळे मी थकून गेली होते आणि ही सहल माझ्यासाठी एक छान एस्केप ठरली!"
नमिता थापर यांच्या फोटोंमधून स्टुडिओच्या दिव्यांपासून आणि लांब कामाच्या दिवसांपासून दूर असलेल्या निवांत सुट्टीची झलक मिळते. एका फोटोमध्ये त्या हिरवळ आणि लाकडी गेट असलेल्या एका आकर्षक गोव्यातील घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या आहेत. तिने सैल पांढरा शर्ट आणि शॉर्ट्स घातलेत, ज्यामुळे तीचा सुट्टीचा मूड दिसून येतो.
दुसऱ्या फोटोत पूलच्या निळ्या पाण्याजवळ एक पुस्तक, गॉगल, पेय, ज्यूस आणि स्किनकेअर उत्पादन ठेवलेले आहे. आणखीन एका उत्कृष्ट फोटोत नमिता उंच नारळाच्या झाडांनी वेढलेल्या हिरव्यागार लॉनमधून जाताना दिसतेय, ज्यात तिने हलका हिरवा पोशाख परिधान केलाय . आणखी एका फोटोत त्या किनाऱ्यावरून चालत आहेत, तर मागून लाटा येत आहेत.
बाकीचे फोटो नमिताच्या आरामशीर वेळेची कल्पना देतात. एका फोटोमध्ये त्या दाट सनबेडवर निळ्या रंगाचा बाथरोब गुंडाळून, डोळे मिटून शांततेत विसावताना दिसत आहेत, तर शेवटच्या फोटोमध्ये ती मोठ्या खिडक्यांजवळ एका सीटवर बसून शांतपणे वाचन करतेय, ज्यामुळे कामाच्या धकाधकीतून विश्रांती घेणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेची प्रतिमा समोर येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.