Anupam Kher At IFFI: 'मुंबईत आलो तेंव्हा खिशात फक्त 36 रूपये होते', इफ्फीत अनुपम खेर यांनी मांडला संघर्ष; Watch Video

Tanvi The Great Iffi: पैसे कमावण्यापेक्षा प्रेक्षकांच्या जीवनात बदल घडविणे हे चित्रपट निर्मात्यांचे मुख्य उदिष्ट असायला हवे, असे मत प्रसिद्ध अभिनेते अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले.
Anupam Kher At IFFI
Anupam Kher At IFFIDainik Gomantak
Published on
Updated on

गंगाराम आवणे

पणजी: चित्रपट बनविताना कलाकृतींवर अधिक भर दिला जायचा परंतु, आता पहिल्यांदा चित्रपट किती पैसा कमावेल, याचा विचार करुन बनवला जातो. पैसे कमावण्यापेक्षा प्रेक्षकांच्या जीवनात बदल घडविणे हे चित्रपट निर्मात्यांचे मुख्य उदिष्ट असायला हवे, असे मत प्रसिद्ध अभिनेते अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले.

ते इफ्फीत माध्यमांशी बोलत होते. आपली संपत्ती बॅंक खात्यावरून ठरत नाहीत तर आपण किती व्यक्तींच्या आयुष्यात बदल घडविला यावरून ती ठरते. ‘लोग जिंदगी गुजारते हे, मैं तो हर पल जिता हूं’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

३६ रुपयांपासून ‘सारांश’पर्यंतचा संघर्ष

मी कामाच्या शोधात मुंबई गाठली त्यावेळी माझ्या खिशात केवळ ३६ रूपये होते. ‘एनएसडी’चा ‘गोल्ड मेडलीस्ट’ होतो परंतु डोक्यावर केस कमी होते. १९८१ साली केस नसले की काम मिळत नव्हते. परंतु मी टिकून राहिलो आणि माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट ‘सारांश’ मध्ये मी वयाच्या २७ व्या वर्षी ५६ वर्षाच्या वृद्धाचे काम केले. ‘सारांश’ मध्ये ही भूमिका केली म्हणूनच मी या क्षेत्रात टिकू शकलो. आव्हानांमुळेच माणूस घडतो.

Anupam Kher At IFFI
IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

‘तन्वी द ग्रेट’...

‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट माझ्या बहिणीच्या मुलीवर आधारित आहे. तिला ऑटिजम आहे. चार वर्षापूर्वी एका कौटुंबिक लग्नात आम्ही सर्वजण एकत्र होतो त्यावेळी सर्वजन आनंदाने नाचत होते, मात्र, तन्वी एका दिशेने पाहत बसली होती त्यावेळी जवळ जावून मी तिला विचारले तन्वी काय पाहतेस ? त्यावेळी तन्वीने म्हणाली, मी माझे जग पाहतेय... तिचा ते शब्द मला भावले तिच्यावर ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट बनविला. हा चित्रपट साकारताना अनेक संकटे आली, परंतु हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर खूप समाधान मिळाले.

Anupam Kher At IFFI
Manoj Bajpayee at IFFI: ‘..श्रीकांत तिवारी इज कमिंग’! इफ्फीत ‘द फॅमिली मॅन’चा खास शो; मनोज वाजपेयीची धाकड एन्ट्री

आयोजकांचा राग आला पण...

‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट दाखवत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यावेळी चित्रपट काही काळ थांबवावाही लागला. मला आयोजकांचा रागही आला होता, परंतु अशा गोष्टी घडत असतात. आपणच या गोष्टी समजून घ्यायला हव्यात, असे खेर म्हणाले. इतरांनीही आयोजनाबाबत तक्रारी केल्या. परंतु लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. आम्ही इफ्फीचे जावई थोडी आहोत...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com