MET Gala: मेट गालात एन्ट्रीने बॉलीवूडच्या किंग खानने इतिहास घडवला पण मीडियाने त्याला ओळखलंच नाही Video

Shah Rukh Khan MET Gala: 'सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाईल' या थीमवर आधारित असलेल्या या सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये शाहरुख खान काळ्या रंगाच्या पोशाखात अत्यंत डॅशिंग दिसत होता
MET Gala 2025
MET Gala 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

King Khan MET Gala Entry: बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानने न्यूयॉर्कमधील मेट गालामध्ये धमाकेदार एंट्री केली आणि सध्या त्याच्या पेहरावाच्या चर्चा सगळीकडे केल्या जात आहेत. 'सुपरफाईन: टेलरिंग ब्लॅक स्टाईल' या थीमवर आधारित असलेल्या या सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये शाहरुख खान काळ्या रंगाच्या पोशाखात अत्यंत डॅशिंग दिसत होता.

शाहरुख खान सोमवारी रात्री एका शानदार अंदाजात कार्लाईल हॉटेलमधून मेट गालासाठी रवाना झाला, तेव्हा त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी आणि त्याची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक होते. त्यानेही दरवेळीप्रमाणेच चाहत्यांना हात दाखवत उत्तर दिलं.

किंग खानने मेट गालासाठी प्रसिद्ध भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला खास पोशाख परिधान केला होता. त्याने काळ्या रंगाचा लांब ट्रेन्च कोट, शर्ट आणि त्याच रंगाची ट्राऊजर घातली होती. मात्र, त्याच्या लूकचं खरं आकर्षण ठरलं ते म्हणजे त्याची खास ज्वेलरी.

बॉलीवूडच्या बादशाहने मेट गालाच्यावेळी गळ्यात अनेक पदरांची माळ घातली होती, ज्यामध्ये 'K' अक्षराचं पेंडंट आणि हिऱ्यांनी जोडलेलं इतर स्टेटमेंट पेंडंट्स होते.

MET Gala 2025
Shah Rukh Khan : "मी तुझ्याविरुद्ध FIR दाखल करणार"! शाहरुखला फॅनने दिली धमकी...

यासोबतच, त्याच्या हातात हिऱ्यांच्या अंगठ्या आणि एका हातात वाघाच्या डोक्याची नक्षी असलेली वॉकिंग स्टिक दिसत होती. शाहरुख खानचा हा लुक बघून मीडिया सुद्धा त्याला ओळखू शकली नव्हती.

शाहरुख खानचा हा संपूर्ण लूक सब्यसाचीने स्टाईल केला होता. मेट गालाच्या निळ्या कार्पेटवर शाहरुखने आपल्या खास शैलीत एक वेगळीच छाप सोडली. त्याचं हे पदार्पण केवळ फॅशन जगतातच नव्हे, तर त्याच्या चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com