Konkani Drama: स्तिमित करणारा आविष्कार; ‘मरणथाव’

Konkani drama Maranthav: आता यातून अद्विक काय मार्ग काढतो, ती डायरी त्याला मदत करते की काय, अद्विकला डायरी देणाऱ्या अभिलाषाचे काय होते, याची उत्तरे नाटकाच्या उत्तरार्धात मिळतात.
Konkani drama
Konkani dramaDainik Gomantak
Published on
Updated on

रंगभूमीच्या मर्यादा असूनसुद्धा नेत्र दीपवून टाकणारा आविष्कार कसा सादर केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी कोकणी नाट्य स्पर्धेत रेणुका एंटरटेनमेंट खडकी - सत्तरी या संस्थेने सादर केलेल्या ‘मरणथाव’ या नाटकाच्या प्रयोगाने दाखवून दिले.

वैभव कवळेकर यांची ही संहिता माणूस आणि त्याचे प्रारब्ध या भोवती फिरते. अद्विक सरदेसाई हा युवक स्वतःच्या प्रगतीआड येणारे अडथळे दूर करता करता स्वतःच कसा या अडथळ्यांची शिकार होतो याचे चित्रण करणारी ही कथा. दादो नावाचा एक ज्योतिषी अद्विकला ३५ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आलेला अभिलाष हा त्याचा भविष्यकाळ असल्याचे सांगितल्यावर अद्विक त्याच्या शोधात जातो.

अभिलाष त्याला त्याची डायरी देतो व ही डायरी म्हणजेच त्याचा भविष्यकाळ असल्याचे सांगतो. नंतर अद्विकचे मॅनेजर रियाबरोबर अनैतिक संबंध जुळणे, हे कळल्यावर त्याची बायको घर सोडून जाणे व घटस्फोटाकरता अर्ज करणे अशा प्रसंगामुळे नाटक एका विशिष्ट उंचीवर पोहोचते. विशेष म्हणजे जे प्रसंग अद्विकच्या आयुष्यात येतात त्याच प्रकारचे प्रसंग अभिलाषाच्या आयुष्यातसुद्धा पूर्वी आलेले असतात.

आता यातून अद्विक काय मार्ग काढतो, ती डायरी त्याला मदत करते की काय, अद्विकला डायरी देणाऱ्या अभिलाषाचे काय होते, याची उत्तरे नाटकाच्या उत्तरार्धात मिळतात.अभिलाषाच्या शोधात निघालेला आपला दोस्त नित्याबरोबर ज्योतिषी दादोकडे गेलेला, मॅनेजर रिया बरोबर प्रणय करणारा अद्विक, त्याला समजविणारा त्याचा मित्र नित्या, भविष्यवाणी वर्तविणारा दादो या व्यक्तिरेखातून नाटक फुलत जाते. यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एकाचवेळी अद्विक आणि अभिषेकच्या आयुष्यातील प्रसंग दाखविणे.

Konkani drama
Konkani Drama Competition: कल्पकतेचे साक्ष देणारे, विलक्षण अनुभूतीचे नाट्य 'भोगपर्व'

रंगमंचाच्या एका भागात अद्विकचा प्रणय सुरू असताना दुसऱ्या भागात अभिषेक व त्याची मॅनेजर शीला यांचा प्रणय दाखविला आहे. बोलण्यात पण ‘कंटिन्युटी’ दाखविण्यात आली आहे. यातून लेखकाने अद्विकचा वर्तमान काळ व अभिषेकचा भूतकाळ याची सांगड घातली आहे. बरेच प्रवेश असूनसुद्धा नाटक कुठेच रेंगाळताना दिसले नाही.

Konkani drama
Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

त्याकरता नाटकाचे दिग्दर्शक रौनक गुरव यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सुजन सावंत देसाई यांचे नेपथ्य तर ‘ए वन’च. दिग्दर्शक गुरव यांचीच प्रकाशयोजना असल्यामुळे त्यांना योग्य मिलाफ साधता आला. अभिराज भगत यांचे पार्श्वसंगीतही प्रयोगाला पूरक असे होते. एकंदरीत स्तिमीत करणारा असा हा ‘मरणथाव’चा प्रयोग कोकणी नाट्य क्षेत्रात एक मोलाची भर घालून गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com