World Premiere of Claudia: ‘क्लावडिया’ चा वर्ल्ड प्रिमियर IFFI मध्ये कुठे पाहाल? पहा Video

Claudia at IFFI: क्लावडिया कोकणी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी (ता.२७) सकाळी ९.१५ वाजता पणजीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये ‘वर्ल्ड प्रिमियर’चे आयोजन केले आहे.

सासष्टी: राजेंद्र तालक यांनी निर्मिती केलेला क्लावडिया कोकणी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी (ता.२७) सकाळी ९.१५ वाजता पणजीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये ‘वर्ल्ड प्रिमियर’चे आयोजन केले आहे. हा आपला आठवा कोकणी चित्रपट असला तर यापूर्वी ‘वर्ल्ड प्रिमियर’ चा मान आपल्या चित्रपटाला मिळाला नव्हता. आपले चित्रपट राष्ट्रीय स्तरावर पोहोचले पण वर्ल्ड प्रिमियर चा मान मिळणे हा आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे तालक यांनी मडगावात पत्रकार परिषदेत सांगितले.

क्लावडिया हा संगीतप्रधान चित्रपट असून हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल होणार आहे. आपण यापूर्वी जे चित्रपट निर्माण केले त्यात अनेक प्रयोग करुन पाहिले. या चित्रपटात सुद्धा संगीताच्या माध्यमातून प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग लोकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्र्वास आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील सर्व तंत्रज्ञ गोमंतकीय आहेत. गोव्यात असे तंत्रज्ञ आहेत हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही तालक यांनी सांगितले.

दरम्यान, या चित्रपटातील कलाकार मुकेश घाटवळ, वर्धन धायमोडकर, लुलु, प्रियांका बिडीये तालक, शिशिर शर्मा यांनी हा चित्रपट यशस्वी होईल. या चित्रपटात काम करताना आनंदाची व समाधानाची विभुती प्राप्त झाल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com