Drishyam 3: 'बघा काय करायचं ते...', अक्षय खन्नाने सिनेमा सोडल्यावर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया समोर

Ajay Devgn Reaction on Akshaye Khanna: 'दृश्यम २' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची आव्हानात्मक भूमिका साकारणारा अक्षय खन्ना आता या आगामी भागात दिसणार नाही
Drishyam 3 news
Drishyam 3 newsDainik Gomantak
Published on
Updated on

Ajay Devgn reaction Drishyam 3: बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझी म्हणून 'दृश्यम'कडे पाहिले जाते. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच सोशल मीडियावर याची मोठी चर्चा होती. मात्र, आता हा सिनेमा एका वेगळ्याच वादा मुळे चर्चेत आलाय. 'दृश्यम २' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची आव्हानात्मक भूमिका साकारणारा अक्षय खन्ना आता या आगामी भागात दिसणार नाही. शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या ५ दिवस आधी अक्षयने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.

वादाचे मूळ कारण: 'कन्टिन्युटी' आणि तो 'विग'

या प्रकरणावर मौन सोडताना दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय खन्नाला सिनेमाची कथा आणि त्याची व्यक्तिरेखा प्रचंड आवडली होती.

नोव्हेंबरमध्येच त्याने कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. मात्र, अक्षयला या भूमिकेसाठी 'विग' घालायचा होता. 'दृश्यम ३' ची कथा तिथूनच सुरू होणार आहे जिथे दुसरा भाग संपला होता. कथेची कन्टिन्युटी राखण्यासाठी अक्षयने विग न घालता नैसर्गिक रूपात दिसणे आवश्यक होते. मात्र, अक्षयने विग घालण्याचा हट्ट धरला आणि अखेर टोकाचा निर्णय घेत सिनेमा सोडला.

Drishyam 3 news
महिनाभर रंगणार 'Drishyam 3' शूट, चित्रपटाची स्टारकास्ट येणार गोव्यात; अक्षय खन्ना असेल का? चाहत्यांना अजूनही उत्सुकता

अजय देवगणची भूमिका: निर्मात्यांवर सोडला निर्णय

सिनेमातील मुख्य अभिनेता आणि सह-निर्माता अजय देवगणला जेव्हा या वादाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने अतिशय व्यावसायिक भूमिका घेतली. अभिषेक पाठक म्हणाले की, "जेव्हा आम्ही अजयला ही गोष्ट सांगितली, तेव्हा तो म्हणाला की हे तुमच्या आणि त्या कलाकाराच्या मधलं प्रकरण आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा."

अजयने या वादात पडण्याचे टाळले असले तरी, शूटिंगच्या तोंडावर अक्षयने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, कारण लूक टेस्टपासून कपड्यांपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती.

प्रेक्षकांची उत्सुकता आणि सिनेमाचे भवितव्य

'दृश्यम ३' हा या फ्रँचायझीचा शेवटचा भाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजय देवगण, तब्बू, श्रिया सारन आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय खन्नाने सिनेमा सोडल्यामुळे त्याच्या जागी कोणत्या प्रभावी अभिनेत्याची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com