Video: छावा सिनेमातील अभिनेत्याची गोव्याला भेट! पुलावर बसून शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले 'तू लैच भारी'

Chhaava Actor Goa Video: तो नेमका गोव्यातील कोणत्या ठिकाणी आहे, हे जरी स्पष्ट झाले नसले तरी त्याचा स्वॅग आणि वावर पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत.
Goa Viral Video
Goa Viral Video Dainik Gomantak
Published on
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सध्या गोव्यात निवांत वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये संतोष गोव्यातील एका पुलावर बसून पाण्यात पाय सोडत, समोरील बोटी पाहताना दिसत आहे. तो नेमका गोव्यातील कोणत्या ठिकाणी आहे, हे जरी स्पष्ट झाले नसले तरी त्याचा स्वॅग आणि वावर पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

या व्हिडिओसोबत संतोषने आपल्या खास शैलीत विनोदी कॅप्शन लिहिले आहे. “एक निवांत वेळ, शांतपणे स्वतःला पुन्हा शोधण्यात रमलेले मन… वगैरे वगैरे… असं घंटा काही नाहीये. गोव्यात आलोय, उद्या निघायचंय आणि किती वेळा आलो, कुठे कुठे फिरलो याचा हिशोब करत बसलोय,” असे मजेशीर शब्द त्याने वापरले आहेत.

त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये हशा पिकला असून, अनेकांनी मजेदार कमेंट्स करत त्याच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनीही “हा आहे खरा गोवा मोड”, “स्वॅग असाच हवा”, “कामातून असा ब्रेक हवाच” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी त्याला पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Goa Viral Video
Goa News: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी! राज्यात काजू, आंबा पीक मिळणार समाधानकारक, कृषी संचालनालयाने दिली माहिती

संतोष जुवेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकताच तो छावा या चित्रपटात झळकला होता. याशिवाय स्मार्ट सुनबाई आणि वाजवा रे हे त्याचे अलीकडे प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. सतत कामाच्या धावपळीत असलेल्या संतोषचा हा निवांत आणि हलकाफुलका गोवा ब्रेक चाहत्यांसाठीही तितकाच दिलखुलास ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com